रोज सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचतो – भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : २५ एप्रिल – “संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच आहे,” अशा कठोर शब्दांमध्ये नवनीत राणा प्रकरणावरुन भाजपावर शिवसेनेनं निशाणा साधल्यानंतर आता भाजपाने या टीकेला तितक्याच कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलंय. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवरुन शिवसेनेच्या टीकेवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांचाही प्रत्यक्ष उल्लेख टाळत संदर्भ दिलाय.
या टीकेला उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. “रोज सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचत असतो. भाजपाच्या नावानं शिमगा करायचा हा एककलमी कार्यक्रम मालकांनी दिला असून त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत असतो. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील दगडफेकीचं समर्थन करताना जर भविष्यात खरोखरच भ्रष्टाचारी नेत्यांवर कुणी दगडफेक, चप्पला फेकल्या तरी निषेध करू नये म्हणजे झाले,” असं उपाध्ये यांनी म्हटलंय.
किती काळ हा सत्तेचा माज राहील सांगता येत नाही
“ठाकरे सरकारविरुद्ध बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा ही ऑफर नाही तर तुमच्या दहशतीला चाप बसवण्याचा लगाम आहे. सरकारविरोधात कुणी बोललं, मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले म्हणून राजद्रोहाचा खटला दाखल करणाऱ्यांचा आणखी किती काळ हा सत्तेचा माज राहील सांगता येत नाही,” असंही उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply