ऊसामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल – नितीन गडकरी यांचा इशारा

सोलापूर : २५ एप्रिल – वाढत्या ऊस उत्पादनावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी चिंता व्यक्त केली आहे. ऊसामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा नितीन गडकरींनी दिला आहे. सोलापूर जिल्हा हा एकेकाळी दुष्काळी होता मात्र आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की 22 लाख ऊसाचा गाळप झाला. इतकं जास्त प्रमाणात लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करावी लागेल हा माझा शब्द आठवणीत ठेवा, असं ते म्हणाले.
गडकरी यांनी म्हटलं आहे की, साखर सरपल्स झाली आहे. काही दिवसापूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ आले होते. त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून बबनराव आज तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पण जर ब्राझीलमध्ये साखर वाढली तर 22 रुपये साखरेचा भाव होईल. तुम्हाला उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत, तुम्हाला राजकारण करायचे आहे. त्यामुळे काय करायचे बघा. ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती करा, मला आनंद आहे की आपल्याकडे इथेनॉल निर्मिती होते. इथून पेट्रोल हद्दपार करा, असं ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की, साखर घाट्यात जाणार आहे. त्यामुळे बगॅस वगैरेपासून हायड्रोजन निर्मित करायला सुरु करा. कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे. आपण साखर उत्पादनमध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, असं गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले की, सोलापूर ते पुणे 6 लेन करण्याची मागणी आहे. दिल्लीला गेल्यानंतर तात्काळ डीपीआर तयार करून घेईन. सोलापूर विजापूर रस्ता लवकरच 6 लेन करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. मागे सोलापूरला आलो असताना अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी अनेक घोषणा पूर्ण झाल्या. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त काम सोलापुरात झाले असावीत असा माझा अंदाज आहे. जुना पूना नाका ते सात रस्ता पूल निविदा प्रक्रिया सुरु आहे, असं गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले की, चेन्नई सुरत मार्गांवर जाताना लॉजिस्टिस्क, इंडस्ट्री पार्क उभारा, विकास होईल. हा देशातला महत्वाचा हायवे असेल. मनालीमध्ये तयार करण्यात आलेल्या अटल टनेलमुळे 3 तासाचा वेळ केवळ 9 मिनिटात पूर्ण होतोय. आम्ही भूसंपादनासाठी 17 हजार कोटी रुपये दिले. भुसंपादन रक्कम वाढावी म्हणून महाराष्ट्रमध्ये काही जणांनी झाडं लावली आहेत म्हणून ऐकलं. आम्ही काय असले धंदे करणार नाही, असंही ते म्हणाले. इथं भाषणात ज्या ज्या आमदारांनी खासदारांनी मागण्या केल्या आहेत. त्या सर्व मंजूर करण्याची घोषणा मी या ठिकाणी करतो, असंही ते म्हणाले.
इलेक्ट्रिक केबलवर बस, ट्रक चालतील असे प्रयत्न आहेत. पायलट प्रोजेक्ट सुरु आहे. यासाठी सोलापूरमधून प्रस्ताव पाठवा, लोकांना एसी गाडीमधून फिरवा. मी केवळ आश्वासन देत नाही आणि दिलं तर ते पाळतोच. सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे घेऊन जातोय. राज्य सरकारने हायवेच्या बाजूला जागा दिली तर लॉजिस्टिक पार्क बांधू, असंही ते म्हणाले.

Leave a Reply