मुलाबाळांची शपथ घालून सांगावे निधीसाठी माझे पाय धरले की नाही? -एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांना विचारणा

जळगाव : १९ एप्रिल – ‘गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली. गिरीश महाजन यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते दुसऱ्यांनी सांगायचे नसते’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार पलटवार केला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. ‘एकनाथ खडसे यांची लायकी नसताना भाजपमध्ये पदे मिळाली अशी टीका महाजन यांनी केली होती. आज खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड केली.
‘गिरीश महाजन यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की? नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते दुसऱ्यांनी सांगायचे नसते. माझ्या मागे लांगूलचालन करणारा गिरीश महाजन माझ्या आशीर्वादाने मोठा झाला, असा पलटवार खडसे यांनी केला.
गिरीश महाजन यांना कोणी ओळखत नव्हतं मी मोठे त्यांना केलं. जामनेर मतदार संघ शिवसेनेचा होता. मी स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याकडे आग्रह केल्याने जामनेर मतदार संघ भाजपाचा झाला. मग त्यांना भाजपमध्ये तिकीट जामनेर मतदारसंघात मिळाले, असा खुलासा खडसेंनी केला.
प्रत्येक वेळी आर्थिक मदतीसाठी मला पैसे द्या, मला पैसे द्या मला मदत मागायचे. प्रत्येक वेळी गिरीश महाजन कोथळीचा सरपंच कोणाचा म्हणता. कोथळीचा सरपंच माझ्या गावचा आहे तर माझाचं. गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पराभव झाला म्हणून त्यांचे मन विचलित झाले आहे, अशी टीकाही खडसेंनी केली.
मला कमजोर करण्यासाठी भाजपाकडून गिरीश महाजन यांना शिरजोर करण्यात आले, नेतृत्व देण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची हाजी हाजी करून त्यांना नेतृत्व मिळाले. महाजन आतापर्यंत माझी हाजीहाजी करत होता गिरीश महाजन यांचा स्व:ताचे नेतृत्व काय? असा संतप्त सवाल खडसेंनी विचारला.

Leave a Reply