काबूलमधील माध्यमिक शाळेत ३ आत्मघातकी बॉम्बस्फोट, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

काबूल : १९ एप्रिल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील माध्यमिक शाळेत आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत ६ हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत ती हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या ठिकाणी आहे.
शहरातील अब्दुल रहीम शहीद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटांची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली असून या घटनेची चौकशी सुरू झाली आहे.
अफगाणिस्तान येथील परिस्थिती काही अंशी शांततेची होत असताना आता पुन्हा एकदा या घटनेनं काबूल शहर हादरलं आहे. शिया समुदायाला लक्ष करत आत्मघातकी हल्लेखोरांकडून हे स्फोट करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
काबूल आणि अफगाणिस्तान येथील परिस्थिती काही निवळत असताना आता पुन्हा एकदा शिया समुदायावर हल्ला करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याची माहिती काबूल पोलिसांनी दिली आहे. या स्फोट एका प्रशिक्षण केंद्राजवळ आणि शाळेजवळ हे स्फोट झाले आहेत. या शाळेतील मुलं घरी परतत असताना चार ते पाच आत्मघातकी हल्ले करण्यात आले आहेत. एकूणच या घटनेचा तपास काबूल पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply