ओबीसी आरक्षण बचाओ अधिवेशनात नाना पटोले व चंद्रशेखर बावनकुळेंचा आले एकत्र

नागपूर : १८ एप्रिल – ‘ओबीसीचे आरक्षण बचाओ’चा नारा देत कामठीच्या गादा परिसरात एका शेतात ग्रामीण भागात अधिवेशन घेण्यात आले. यावेळी अधिवेशनात ओबीसींचे नेतेमंडळी एकत्र झालेत. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे दोन्ही नेते मांडीला मांडी लावून बसलेले दिसून आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी समाजाने एकत्र येऊन ओबीसाच्या आरक्षणासाठी लढा दिला पाहिजे. त्यासाठी पक्ष बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. ओबीसीची जनगणना मागणी लावून धरण्यासाठी मोट बांधण्याची गरज उपस्थितीतांनी बोलून दाखवली.
यावेळी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, पंकज वंजारी यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. राज्यात आणि देशात सर्वात जास्त संख्या ओबीसीची आहे. माझ्या राजकीय जीवनातील विविध पदामागेही ओबीसीची राजकीय शक्ती राहीली आहे. ओबीसी समाजाचा सहभाग असावा म्हणून केंद्रात खासदार झालो होतो. अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याने खासदारकी सोडली. विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसीची जनगणना व्हावी असा ठराव पारित करून केंद्र सरकारकडे पाठवल्याचे काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणालेत.
ज्यात गेले अनेक वर्ष ओबीसी समाजाचा आयोग अस्तित्वात नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आयोग निर्माण केला. ओबीसी समाज 60 टक्के असताना, जर ओबीसी समाजाला आरक्षण मागावे लागत असेल तर तो आपला पराभव आहे. 60 टक्के असलेला ओबीसी समाज एकत्रित आला तर कोणीही काहीही बिघडवू शकणार नाही, असा विश्वासही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
केंद्र सरकारकडून खाजगीकरणाचा आपण सर्वांनी विरोध करण्याची गरज आहे. कारण सर्व सार्वजनिक उपक्रम आणि विभागांचे खाजगीकरण होत राहिले तर उद्या तिथे आरक्षण काय राहील? त्यामुळे केवळ राजकीय नाही तर नोकरी असो की इतरही ठिकाणी आरक्षण मिळाले पाहिजे. तसे न झाल्यास आरक्षण संपेल, असेही नाना पटोले म्हणालेत. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आलो ते जोडे काढून आलो. इथे मी समाजाचा प्रतिनिधी म्हणून आलो. त्यामुळे सर्व समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. समाजाच्या नेत्यांनी केवळ सत्तेत राहण्यासाठी समाजाचा वापर करू नये, असेही नाना पटोले म्हणालेत.
जोरदार नारे देत भाषणाला सुरवात केली. 60 टक्के ओबीसीला न्याय मिळवून देण्यासाठी बबनराव तायवाडे यांनी सगळ्या पक्षांना एकत्रित आणले. ओबीसीचीजी ज्योत लागली ती आता तेवत ठेवायची आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या पोहचवून पूर्ण झाल्या पाहिजेत. जोपर्यंत समाज संगठित होत नाही, तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही. सरकारला आपण संगठित होण्याची चाहूल लागणार नाही, तोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नसल्याचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणालेत.

Leave a Reply