सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : १६ एप्रिल – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलं आहे. या बैठकीत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. आंबिका सोनी, दिग्विजय सिंह, मल्लिकार्जून खर्गे, अजय माकन यांच्यासह उपस्थित आहेत. राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर देखील उपस्थित आहेत, अशी माहिती आहे. प्रशांत किशोर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या संपर्कात होते. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस प्रशांत किशोर यांची मदत होऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसमधील सुधारणा, संघटनेच्या पातळीवर बदल, उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेत बदल करणं, निवडणुकांमधील आघाड्या, पक्षाला निधी मिळवणं यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रशांत किशोर आणि काँग्रेस हे यापूर्वी सोबत काम करत होते. सप्टेंबर २०२१ मध्ये नंतर काँग्रेसनं सुनील कानुगोलू यांच्याशी करार केला होता. मात्र, आता पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकानंतर पुन्हा एकदा काँग्रेस आणि प्रशांत किशोर सोबत काम करु शकतात. आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणकीची रणनीती प्रशांत किशोर यांच्यावर दिली जाऊ शकते.
राहुल गांधी यांनी यापूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीत आपल्या पक्षाचा उद्देश काय, आपण लोकांपर्यंत काय पोहोचावयाचं याचा विचार केला पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगळी रणनीती बनवली पाहिजे, असं म्हटलं होतं. आपण पारंपारिक पद्धतीनं निवडणूक लढवत आहोत. आपल्याला उमेदवार किंवा व्यक्ती अशी निवडणूक लढवता पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. काँग्रेस महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु वल्लभभाई पटेल यांच्या विचारावर वाटचाल करत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं खराब कामगिरीनंतर प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनी सोबत काम करण्यास सुरुवात केली होती. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला. यानंतर आता २०२६ पर्यंत आयपॅकची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply