मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनाचा मजबूतपणा

सगळ्यांमध्ये बडबड करणारा, सगळ्यांना हसत ठेवणारा आदित्य उदास होता, अचानक तो कोणाशीच बोलत नाही. एकटा एकटा राहतो. शाळेत सुद्धा वेगळा राहतो. काय झालं माहित नाही. शाळेत सगळ्यांचा आवडता विद्यार्थी. दिवसेंदिवस तो खंगत जातो आणि अचानक एके दिवशी तो आत्महत्या करतो आपल्या मायबापावर भका मोठा दुःखाचा दगड ठेऊन. सगळ सुन्न……
आपण अशा घटना समाजात घडतांना बघतो. ह्याला कारणं वेगवेगळी आहे. सामाजिक अवस्थेत जखडलेल्या ह्या मानवी स्वभावाला जबाबदार कोण? आत्महत्या करण्यास माणूस परावृत्त का होतो. माणसाला जन्म हा एकदाच मिळतो. तर त्या जन्माच सोनं का करत नाही. अरे, आत्महत्या हे काय एकच कारण नसतं. स्वतःच नाही तर दुसऱ्याचा विचार करा. कधी कधी आपल्या तोंडून निघालेल्या शब्दामुळे समोरचा व्यक्ती दुखावला जातो आणि दुखवल्यामुळे तो उदास होती. नाही नाही ते विचार त्याच्या मनात येतात आणि त्या विचारांनी तो खंगत जातो. आपले मन इतके कमकुवत करू नका ते मजबूत करा.
आजकालच्या पिढीमध्ये ह्याचे परिणाम दिसून येतात. जराही मनाविरुद्ध घडले तर लगेच आत्महत्या करण्यास परावृत्त होतात. ह्यावर मार्ग निघू शकतो. आपल्या मनातला संवाद हा दुसऱ्या जवळ मन मोकळं पणे करा. हा संवाद तुम्हाला कदाचित सावरायला मदत करेल. जर तुम्हाला कोणती गोष्ट खटकत असेल तर ती दुसऱ्याच्या बोला. मनातला सगळ सांगा कदाचित तुमच्या काळजीचे उत्तर, त्यावरचा उपाय हा त्याच्याजवळ असेल. ती तुम्हाला ह्यातून सावरायला नक्की मदत करेल. बोलतं बोलता तुम्हाला रडायला येईल पण तुम्हाला तुमचं मन हलक झाल्यासारखं होईल. त्याच्या सल्ल्यामुळे कदाचित तुम्हाला जगायची एक नवी दिशा मिळेल, नवीन उम्मेद मिळेल.
आत्महत्या हावेकाच शब्द एकूण हृदयात धडधडायला होता. एकमेकात रोज वावरणारी व्यक्ती अचानक दिसेनाशी होते. त्या व्यक्तीची असण्याची सवय अचानक अदृश्य होते. का? का इतका जीव स्वस्त होतो? आपल्या जगण्याचे मोल इतकेच आहे का.
आपल्या बरोबर एखादी घटना घडली त्यावर त्वरित उपाय करावा. मोठ्या माणसाचा सल्ला घ्यावा. काळ आपल्याबरोबर काय घडले ह्यावर विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याबरोबर चांगल जय घडेक ह्याचा विचार करावा. गेलेले दिवस मोजू नका तर उरलेले दिवस आनंदात कसे जाईल ह्याचा विचार करा. आपल्या मनाला एक मजबुतीने आवरण करा. त्याला कमजोर, नाजूक करू नका. बाप जसा आपल्या मुलाला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी कणखर बनवतो तसेच तुम्ही तुमच्या मनाला समाजात होणाऱ्या घटनासाठी कणखर बनवा. लढण्याची ताकद वाढवा.
आज तरुण पिढीने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपल्याला पालक काही सांगत असेल तर त्यांच्या शब्दांचा त्यांच्या सांगण्याचा राग मानू नका कारण त्यांच्या शब्दात राग नाही तर ते काळजीपोटी तुम्हाला काही सांगत आहे. आज तुम्ही जे काही आहात ते केवळ त्यांच्यामुळेच आहे. त्यांना तुमच्याकडून काही नको आहे त्यांनी त्यांचे काम केले आहे. त्यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडली आहे. त्यांना सुखात ठेवणे ते आता तुमचे काम आहे. अरे. तुम्हाला गमवण्यासाठी थोडी तुम्हाला जन्माला घातलं. ते त्यांचं आयुष्य जगले. आता तुमची वेळ आहे त्यांना सुखात ठेवणे. त्यांना आनंद द्या नुसतं आत्महत्या हा त्या मागचा उपाय नाही. नवीन आयुष्य जागा, स्वतः जागा आणि दुसऱ्यांना आनंद द्या.
आपल्यामध्ये नेहमी काही गोष्टींना थारा देऊ नका. नेहमी त्या गोष्टी दूर ठेवा. स्वार्थ, मोठेपणा, अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना ह्या गोष्टींना तुम्ही जर दूर ठेवले तर तुम्हाला आनंद देता पण येतो आणि आनंद घेता पण येतो. म्हणूनच म्हणते ह्या गोडती मनापासून करा. ह्यावर एकच उपाय सगळ विसरा आणि समोरच्याला माफ करा

पल्लवी उधोजी

Leave a Reply