रामाचे नाव घेत देशामध्ये धार्मिक दंगली घडवून आणल्या जात आहेत – कन्हैया कुमार

भंडारा : १३ मार्च – सध्या देशामध्ये रामाच्या नावाचा दूरउपयोग केला जात आहे. ज्या रामाने वनवासात असताना शबरीचे बोर खाल्ले होते त्याच रामाचे नाव घेत सध्या देशामध्ये धार्मिक दंगली घडवून आणल्या जात आहेत, असा घणाघात जेएनयू चे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे नते कन्हैय्या कुमार यांनी केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त काल भंडारा येथे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. भंडारा शहरातील दसरा मैदानावर ही हा कार्यक्रम झाला.
मोदी सरकार हे व्यापार असून चंदा लेने वालो को धंदा देत असल्याच्या आरोप कन्हैय्या यांनी यावेळी केला आहे. मोदी,आणि अमित शहा देश विकत आहेत, अडानी अंबानी विकत घेत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. हे करत असताना शासकीय कंपन्या घाट्यात असल्याचे कारण शासन देत सर्रास हे विकणे सुरू आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे. आई-वडील आजारी झाले तर आपन काही विकत नाही. मात्र, मोदी सरकार वस्तू विकण्याचे काम करत आहे.
नही बचेंगा ईयर इंडीया – सरकारी वस्तु नाही तर सरकारी प्रधानमंत्री पण नको असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. मोठ्या कष्टाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू, एकीकडे देश विकणारे लोक आहेत तर दुसरीकडे आम्ही देश वाचणारे लोक एकत्रित येऊन याचा विरोध करू असेही त्यांनी यावेळी सांगितले
भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा अशी पद्धत सुरू केली होती. नरेंद्र मोदी हे देशातील लोकांमध्ये जाती धर्माच्या नावाने एकमेकविषयी द्वेष निर्माण करून राज्य करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. कारण मोदी इतिहासात फेल झाल्याने मोदी आपला इतिहास विसरले असल्याचे कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे. आमचे एका देशाचे दोन देश बनले, एका शेजारी देशाचे हाल काय होत आहेत हे तुम्ही पाहत आहात. मात्र, आमच्या देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू होते म्हणून देश आज स्थिर आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत

Leave a Reply