बा हॅनिमना तू जिंकलास…- डॉ. श्रीकांत राजे

डाॅ. सॅम्युअल ख्रिश्चियन हॅनिमन या नावाने तुला कुणी ओळखणार नाही.
ही तुझी 267 वी जयंती आहे. हे होमिओपॅथी म्हणून फार कमी लोकांना कळेल. तु स्वतः साठी नाही “जगाच्या कल्याणा” होमिओपॅथी चिकित्सा पध्दतीला सुरुवात केली. “आजार व्हायला चैतन्य शक्तिची दुर्बलता कारण असते नंतर लक्षणाच्या रुपामध्ये आपण आजारी पडतो.
विशिष्ट लक्षण समुचयाला रोगाचं नाव दिल्या जाते.” असे तू पहिल्यांदा म्हणालास

बा…
तुझ्या काळात जगाची लोकसंख्या ती किती..? त्यातही वैद्य / आरोग्य विज्ञानाच्या संकल्पना अंधारात चाचपडत होत्या. दीड फुट तापमापकाचा तो काळ. प्लेगच्या गाठीला गरम सळाकीने चटका देण्याचे प्रकार आता आताचा. ब्युबाॅनिक न्युमॉनिक हे एकाच प्लेगचे आविष्कार आहे हे “उमजणारं” नव्हतं. आजही आम्ही कोरोना व्हेरियंटच्या रुपांच्या नावावर भाळून जातो….

बा….
तु तेंव्हा त्या काळात सागून गेलास “निकोप , निरोगी, आरोग्याची स्थापना हेच चिकित्सकाचे परमोच्च ध्येय असावे.” आता आरोग्याच्या ध्येया सोबतच अर्थकारणाला गती मिळवून देणं अधिक प्रतिष्ठेचं मानल्या जातं….

बा….
रोगाचं कारण हे “व्हायटल फोर्स” (चैतन्य शक्ती) शी निगडीत आहे. असं खुप वर्षे अगोदर तु म्हणालास. आज आमचा आरोग्य प्रवास सुध्दा” जिवाणू “कडून” “विषाणू” कडे.होतोय. आरोग्या करीता न दिसणारे पण व्याधी मध्ये बदल घडविणारे प्राणायाम, योग क्रिया, आहार नियोजन, ह्या कडे आता आम्ही वळत आहोत.
अरे 2 वर्षापूर्वी पासून “आरोग्या साठी योग” या थीम ने” जागतीक योगदिन “सुध्दा सुरु झाला बघ. तू खुप अगोदर सुक्ष्म आरोग्य विज्ञाना कडे वळण्याचे सांगून गेला. आज आजार आणि उपचाराच्या बाबत जगाने त्याचा स्विकार केलाय. बघ

बा….
औषधी शक्ती कृत करण्या साठी “सुक्ष्म” अवस्थेत वापरण्याचे तु आवाहन केले. बा… खरी गंमत तर 1885ला झाली. लुई पाश्चरने रॅबिज वरील लस तुझ्याच तत्वावर आधारित शोधून काढली….. आज अनेक आजाराचे लसी प्रतिबंध तुझ्याच प्रतिक्रिया ह्या तत्वावर आधारित आहे…

बा…
. तु रोग दुरुस्ती केवळ औषधाने संपणारी नाही तर रोग दुरुस्तीतील अडथळे obstacle to cure सुध्दा चिकित्सकांनी विचारपूर्वक दूर करायला हवे. असं तू सांगून गेला आज सर्व चिकित्सक पथ्य अपथ्याचा विचार करित आहेत….

बा खरं सांगू….
आमच्या पिढीने तो दिवस बघितला जेंव्हा कोरोना साठी सर्व स्थरातून “आर्सेनिक अल्बम” ची तुफान मागणी होऊ लागली. शासकीय स्तरातून, आरोग्य विभागांनी सुध्दा “जीनस एपीडेमिकस” म्हणून आपल्या “आर्सेनिक अल्बम” वर शिक्का मोर्तब केलं बरं. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ” असं पुन्हा वाटलं. आणि तुझ्या प्रतिमे समोर मनःपूर्वक पुन्हा नतमस्तक झालो.
बा…
तुझा काळ खुप उपेक्षा, अपमान, अशा संघर्षातून गेला. तरी तु आम्हाला वाट दागवून गेला. रोग मुक्ती आणि आरोग्याची स्थापना विविध मार्गाने सुध्दा होऊ शकते. हा सर्व समावेशक दृष्टीकोनतू आंम्हामध्ये पेरुन गेला. आज सुध्दा “एक आजार विविध औषधांनी बरा होऊ शकतो आणि एक औषधी विविध आजारावर गुणकारी असू शकते “ही द्दृष्टी होमिओपॅथी मुळे मिळाली.

बा……
आम्ही अपयशी म्हणून, काहीतरी करायचे म्हणून होमिओपॅथी ला प्रवेश घेतला. अभ्यासक्रम, गुरुजन वर्ग, यांची खुप चेष्टा केली. त्याचा आज खुप पश्चाताप होतोय. आज आणि आजच्या दिवशी गुरुजनांची खरंच मनोमन क्षमा मागतो.
नियतीने आंम्हाला ह्याच मार्गाने रुग्ण सेवाकरण्याची संधी दिली. बा खरं सांगू “तुमच्या औषधीने बरं वाटलं” हे ऐकलं की अपयशाच्या सर्व कळा आनंदाने सहन केल्या जातात खुप समाधान वाटतं.
निराशेचे मळभ निघून जातात. मन आत्मविश्वासाने प्रकाशीत होते.
आणि तुझ्या स्मरणाने प्रतिमे समोर आम्ही नतमस्तक होतो…..

बा..
नुकताच माझा मित्र अयोध्या वाराणसी करुन आला. तो म्हणाला “तिकडे सर्वात जास्त दवाखाने होमिओपॅथी चे आहेत.” म्हणून… ऐकल्यावर खुप बरं वाटलं रे….
बा…. बस्स…
कै. सुरेश भटांच्या वंदनीय डाॅ. बाबासाहेबांना उद्देशून लिहीलेल्या “भीमवंदनेच्या ओळी आठवतात…

” कोणते आकाश हे… तु आंम्हा नेले कुठे…. “
” तु दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे……”
ह्या भराऱ्या आमुच्या,
ही पाखरांची वंदना…

बा..
तुझ्या जन्मदिनी आंम्हा
दाभा आंतर भारती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विनम्र अभिवादन…

डॉ. श्रीकांत राजे

Leave a Reply