जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांनी भरलेल्या रेल्वेची मोठी दुर्घटना तोडक्यात टळली

ळगाव : ११ एप्रिल – जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी भरलेल्या एक्स्प्रेस गाडीसोबत मोठी दुर्घटना अगदी थोडक्यात टळलली आहे. एसी डब्यातून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. पण, वेळीच रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळलला आहे.
जळगाव- भुसावळ रेल्वे स्थानकावरून 11 वाजेला निघालेल्या अहमदाबाद -बरोणी एक्सप्रेसला भुसावळ-जळगाव यादरम्यान रेल्वे रुळावर s-7 या ac बोगीचे सेंटर ओपन असल्याने बोगीतून धूर निघताना दिसून आले. अचानक धूर निघत असल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
यावेळी एक्स्प्रेसच्या गार्ड व चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी जळगावातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी केली. तात्काळ महापालिकेचे तीन अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, अग्निशमन बंब पोहचण्याआधीच रेल्वेच्या टेक्निशियनने सेंटर ओपन करून वाढणारी आग बंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे जळगाव रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply