चंद्रपूरमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या हत्येचे गूढ उकलले

चंद्रपूर : ११ एप्रिल – भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउटमध्ये सापडलेल्या तरुणीच्या निर्वस्त्र मृतदेह आढळल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींपयर्ंत पोहोचण्यात यश प्राप्त केले असून, मयत युवतीच्या हत्येमागे मत्रिणीचा हात असल्याचे उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक युवती व आरोपी मुलगी या दोघी रूममेट होत्या. काही महिन्यांपूर्वी या दोघींमध्ये काही कारणावरून भांडण झाले. तेव्हापासून आरोपी मैत्रिणीचा इतर मैत्रिणींसमोर अपमान करीत होती. वारंवार होणारा अपमान सहन न झाल्याने मृतक युवतीच्या मैत्रिणीने तिला अद्दल घडवायचे ठरविले. तिने हत्येचा कट रचून आपल्या योजनेत अन्य काही लोकांना योजनेत सहभागी करून घेतले. योजनेप्रमाणे त्या युवतीने एका विधीसंघर्षग्रस्त बालकालासुद्धा कटात सामील करून घेतले व योजनेप्रमाणे त्या बालकाने दिनांक ३ एप्रिल २0२२ रोजी रात्री ८ वाजता मयत युवतीला वरोरा नाका येथे बोलवून घेतले. त्या ठिकाणावरून तिने व आरोपीने मयत युवतीला मोटार सायकलवर बसवून घटनास्थळी नेले. रात्री १२ वा.च्या सुमारास घटनास्थळी निर्जनस्थळी नेऊन विधीसंघर्षग्रस्त बालकाने मयताला मारहाण करून जमिनीवर खाली पाडले. नंतर तिचे पाय प्रकडून मांडीवर वार केले. सदर वेळी अन्य आरोपीने युवतीच्या पोटावर बसून प्रथम गळा दाबून खुन केला. नंतर तिची धारधार शस्त्राने गळा कापला. त्या युवतीची ओळख पटू नये म्हणून दोघांनीही चाकूने आळी पाळीने मृतकेचा गळा कापला. तसेच संपूर्ण कपडे काढून तिला निर्वस्त्र केले व शीर घेऊन मोटर सायकलवरून पसार झाले.
दि. ४ एप्रिल २0२२ रोजी पहाटेदरम्यान पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत भद्रावती ते तेलवासा रोड मायक्रॉन शाळेमागील पडीत शेतशिवारात अंदाजे २0 ते २२ वर्षीय युवती मुंडके कापून निर्घृण हत्या करून निर्वस्त्र स्थितीत मिळून आली होती. तिच्या शरीराला मुंडके (शिर) नव्हते. कोणीतरी अज्ञात इसमाने सदर युवतीच्या खुन करून तिची ओळख पटू नये म्हणून तिथे मुंडके शरीरापासून वेगळे करून तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरून पोलिस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमाविरुद्ध अपराध क्रमांक १४१/ २0२२ कलम ३0२, २0१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात आला. सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलिस स्टेशन, सायबर सेलचे विविध पथक पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात तपास करीत आहेत. मयत मृतदेहाची ओळख पटविण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेल चे सायबर एक्सपर्ट मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली

Leave a Reply