लवकरात लवकर देशात रामराज्य येणार, याबद्दल देवाकडे प्रार्थना – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नाशिक : १० एप्रिल – ‘रामाचे मंदिर लवकरच अयोध्येत उभारले जाणारच आहे. पण लवकरात लवकर देशात रामराज्य येणार आहे, याबद्दल मी देवाकडे प्रार्थना केली आहे’ असं वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.
रामनवमीच्या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थितीत होते.
याठिकाणी मी प्रत्येक वेळेस येऊ शकणार नाही पण आपण तरी इथे दररोज दर्शन घ्या. श्रीलंका जिंकून त्यांना परत केली, किती मोठी गोष्ट. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. श्रीरामाचे चारित्र्य जेवढे अभ्यासू, तेवढी आयुष्यात प्रगती होईल. श्रीलंकेला जिंकल्यानंतर रामाने देश परत केला होता. रामांचा हा मोठेपणा आहे. ते मर्यादा पुरषोत्तम आहे. रामाचे चरित्र जितके वाचाल तितके तुमचे आयुष्य आणखी सुकर होईल, असं यावेळी राज्यपाल म्हणाले.
तसंच, महात्मा गांधी सुद्धा ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीता राम’ म्हणत होते. त्यामुळे तुम्ही आयुष्यात रामाचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. मग आपण सामन्य कार्यकर्ते असो, सामन्य व्यक्ती असो किंवा राजकीय व्यक्ती असो सर्वांनी रामाचे आदर्श ठेवले पाहिजे’ असं आवाहनही राज्यपालांनी केलं.
रामाचे मंदिर लवकरच अयोध्येत उभारले जाणारच आहे. पण लवकरात लवकर देशात रामराज्य येणार आहे, याबद्दल मी देवाकडे प्रार्थना केली आहे’ असंही राज्यपाल म्हणाले.

Leave a Reply