आंघोळीकरिता नदीपात्रात उतरलेल्या तरुणाचा डोहात बुडून मृत्यू

नागपूर : ९ एप्रिल – मित्रासोबत आंघोळीकरिता गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना पारशिवनीजवळील पेंच नदीपात्रातील घोगरा येथे शुक्रवार, ८ एप्रिल २0२२ रोजी दुपारी घडली. प्रतीक अनिल चव्हाण (१७, डब्ल्यूसीएल कॉलनी, विकासनगर, नागपूर ) असे मृत युवकाचे नाव आहे. मृत युवक एका मित्रासह पारशिवनी परिसरात ट्रॅक्टरच्या इव्हेंटकरिता आला होता. यानंतर ते दोघे दुपारी ३ वाजताच्या सुमारास श्री क्षेत्र घोगरा येथे आले. थोडा वेळ परिसरात फिरल्यानंतर प्रतीक आंघोळीकरिता मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या डोहात उतरला. परंतु, डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती पारशिवनी पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहे.

Leave a Reply