नाना पटोलेंनी घेतली शरद पवारांची भेट, अनेक विषयांवर गंभीर चर्चा

मुंबई : ८ एप्रिल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरला भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. प्रामुख्याने राज्यात सध्या वीजेचा तुटवडा भासत असल्याने या विषयावर गांभीर्याने चर्चा केली असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यामध्ये सध्या लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. केंद्राने कोळसा न दिल्याने प्रकल्प बंद पडले आहेत, हा प्रश्न तातडीने कसा निकाली काढता येईल यासोबत केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने राज्यात काम करत आहेत याबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

हा विषय आमच्या पातळीवरचा नाही. हायकमांड निर्णय घेईल. त्याचसोबत महामंडळ वाटप यावर देखील चर्चा झाली. दोन ते तीन दिवसात आम्ही एकत्र येऊ आणि मग चर्चा करू असे नाना म्हणाले. तसेच आयएनएस विक्रांत जहाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जी वर्गणी गोळा केली होती त्याचा ही प्रश्न आहे. परंतु विषयाला वेगळे वळण देण्याची प्रक्रिया सुरू असून हा पैशाचा प्रश्न आहे, याचे उत्तर भाजप का देत नाही आहे? असा प्रश्न ही नाना यांनी उपस्थित केला.

Leave a Reply