महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यात चोरी?

नागपूर : ६ एप्रिल – नागपुरात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यात चोरी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. संबंधित तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. सदर पोलीस ठाण्यात शासकीय बंगल्यात चोरी करण्यात आली. तसेच धमकी देऊन मारहाण करण्यात आली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यासंदर्भात अधिक माहिती देऊ शकले नाहीत. याबाबत गोपनीयता पाळत असल्याचं दिसून येतंय. ही चोरीची घटना मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडली. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखीतल्याच व्यक्तीनं असं केलं असल्याची माहिती आहे. एक लाख रुपये रोख तसेच संपत्तीची काही महत्त्वाची कागदपत्र चोरून नेल्याची माहिती आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली.
संबंधित पोलीस अधिकारी या आयपीएस आहेत. त्यामुळं या घटनेकडं चाणाक्ष नजरेनं पाहिलं जात आहे. नेमक्या या पोलीस अधिकारी कोण आहेत?, त्यांच्याकडून चोरी झाली असताना त्या कुठे गेल्या होत्या का? त्यांना धक्काबुक्की तर केली नाही. मग, स्वतः अधिकारी असताना त्यांना स्वतःचे संरक्षण कसे केले नाही? संबंधित चोराला अटक का केली नाही, असे प्रश्न आता चर्चेले जात आहेत.
एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडं चोरी करण्यासाठी हिंमत लागते. येवढे हे चोर निर्ढावले कसे. त्यांना भीती कशी वाटली नाही. गोपनीयता का पाळली जात आहे. असे नानाविध प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहेत. पण, याची अधिकृत माहिती कुणी दिली नाही. चर्चा आहेत. नागपुरात गुन्हेगारी का वाढतेय. अधिकारी स्वतःचंच संरक्षण करण्यास सक्षम नाहीत का, असे प्रश्न यानिमित्तानं निर्माण होत आहेत.
आरोपी हा कौटुंबिक मित्र असल्याची माहिती आहे. सदर पोलीस ठाण्यात चोरी करणे, घरात घुसून मारहाण करणे तसेच धोकाधडी करणे यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply