तरुणींच्या मदतीने अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मुलाला अटक

नागपूर : ६ एप्रिल – नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे. तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणी नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या आरोपींनी पोलिसांना त्यांच्या अन्य साथिदारांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य तीन आरोपींनाही अटक केली आहे. यातील आरोपी रामसिंह मीणा हा रेल्वे सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर, 23 वर्षांचा कुश माळी हा आरोपी पोलीस कर्मचार्याचा मुलगा आहे. या ड्रग्ज तस्कारी प्रकरणात पोलिसांचा सहभाग समोर आल्यानं नागपुरात आता एकच खळबळ उडाली आहे.
नागपुरात काही तरुणींना केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली ओडिशाला नेऊन तिथून त्यांच्यामार्फत अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. प्रतिस्पर्धी टोळीतील दोन गुंडांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नागपुरातील काही तरुणींचा फक्त अमली पदार्थांच्या तस्करीत वापर होत नाही, तर एक दुसरी टोळी त्यांचा छळही करत असल्याचं व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे. पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोघांना अटक केली आहे. तर तरुणींचा लैंगिक छळ करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

Leave a Reply