तुम्ही थोडं अडजस्ट केलं तर अजून चांगलं काम चालेल – अधिक चव्हाण यांची देवेंद्र फडणवीसांना कोपरखळी

नांदेड : ३ एप्रिल – ‘देवेंद्रजी, आमच्या महाविकास आघाडीचं काम चागलं चाललंय. तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर अजून चांगलं काम चालेल’ असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी लगावली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला असताना नांदेडमध्ये आज महाविकास आघाडी सरकारचे मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस नायगाव तालुक्यातील कुंटुर येथे दिवंगत नेते गंगाधरराव कुंटुरकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि स्मृतीग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण करत एकमेकांना कोपरखळी लगावली.
तुम्ही एकत्र येणार का असे अनेकांचे प्रश्न होते. पण मीडियाचा भ्रमनिराश झाला देवेंद्रजी. त्यांना वाटलं आपण एकत्र व्यासपीठावर येतो की नाही की, आजच्या समारंभाप्रमाणे राज्याचं राजकारण व्हावं. अनेक वर्षानंतर सगळ्या पक्षाचे नेते एकत्रित आले’ असं अशोक चव्हाण म्हणाले.
देवेंद्रजी, आमच्या महाविकास आघाडीचं काम चागलं चाललंय. तीन वर्ष आता सरकारला पूर्ण होती. तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर अजून चांगलं काम चालेल’ असं म्हणत चव्हाण यांनी फडणवीसांना कोपरखळी लगावली.

Leave a Reply