सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

जाणता राजा ते भीष्म पितामह

सरकार कसं नसावं? मुख्यमंत्री कसा नसावा? एखाद्या पार्टीचा प्रवक्ता कसा नसावा? एखाद्या सरकारचा रिमोट कंट्रोल कसा नसावा? ह्या न न्ना च्या पाढ्याची अतिशय उद्बोधक “केस” म्हणजे महाराष्ट्र सरकार ची अडीच वर्षे.

सम-पादक राज्यसभेतील कार्यकाल संपवून पायउतार जाहले. एक दिवस सर्व मिडिया देखत म्हणाले की काही दिवस चुप राहणे श्रेयस्कर असते. हुश्श्श्श्…….. जनतेने एक निश्वास सोडला. पण जनतेचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि दूरदृष्टी अधू, वाचाळ तोंडवीर, बिनबुडाचे निर्णय प्रधान, बिनडोक वक्तव्यखोर, राजकारण शून्य योद्धा, एका फाटण्यात ५२ लाख परत असली भाडखाऊ प्रतिमा असणारा सम-पादक परत मिडिया माईक समोर उभा ठाकला. आज एक एप्रिल – आपल्या प्रगल्भ बुद्धीचे वाभाडे काढत – साहेबांनी मोदींवर चिखलफेक केली. १५ लाख देणार असे मोदींनी सांगितले म्हणजे मोदींनी जनतेला एप्रिल फूल बनविले. असा शेरा मोदींवर लादून जबाबदार सम-पादकाने सामान्य जनतेची जाणीवपूर्वक दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी हा प्रचार कॉंग्रेस ने खुप केला. सामान्य जनतेत भ्रम कायम राहावा, ह्यासाठी पराकाष्ठा केली. मोदींविरुद्ध जनतेत जहरी लहर लहरवायला प्रचंड मेहनत, मोदी विरोधी नेते, पार्ट्या करीत आहेत. पण ह्या सम-पादकाने जेव्हा १५ लाख जनतेच्या खात्यात असा मोदीविरोधी “ब्र” काढला, त्यावेळी मात्र शिवसेना, राकॉं, कॉं ह्यांचे टाळके कसे फिरले आहे? ह्याचा अनुभव आला.
वाचक मित्रांनो! मविआ आघाडी ची २- अडीच वर्षांची कारकीर्द बघा! राजपाट सांभाळायला “परिपक्व” नेता हवा असतो. ह्या मविआ आघाडीचे नाव “महा विकास आघाडी” म्हणजे आजतागायत जो महाराष्ट्र राज्याचा विकास झाला तो विकास ह्या युती सरकारला मान्य नव्हता. भाजपा- शिवसेना युतीचा अजेंडा मान्य नव्हता. शिवसेनेचा – शिवसेना पक्षाचा आजपर्यंत झालेला विकास – शिवसेना पक्षाचा विकास मान्य नव्हता. शिवसेना नेतृत्वाने एवढेच बघितले होते की माजी मुख्यमंत्री फडणवीस कसे निर्णय घेतात, त्यांचा सरकारी क्षेत्रात वकुब काय मोठा, मानाचा! त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणावर लोकांची स्तुतीसुमने. मुख्यमंत्री पदाचा मान. मुख्यमंत्री पदाची मरातब ह्या सर्व अधिकाराचा मानकरी आपण का होवू शकत नाही? ह्या असुयेपोटी केवळ महाराष्ट्रातील सामान्य जनतेला उल्लू बनवून मत घेतली गेली. आणि कपटाने युती केली गेली. भाजपा ला विरोधी बाकांवरचा रस्ता दाखविण्यात आला. आणि तीन ही पक्ष आता नुसता विकास नाही तर “महा-विकास” करण्यासाठी आघाडीत उतरले व राज्याला असुयेपोटी धाब्यावर बसविण्यात आले आणि तीन ही पक्ष, महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या वचनांची चिरफाड करीत, जनतेच्या घामाच्या स्वार्थी पैशाचा माज करीत, भ्रष्टाचाराचे वसुली सरकार नियमांची पायमल्ली करीत आपापल्या पक्षाचा “महा विकास” करीत होती.
असुया, अहंकारातून राजपाट मिळाला की उन्मत्त, बेकाबू नेतृत्व राज्याचे तारु कसे भरकटवून टाकतो, ह्याचे जीवंत उदाहरण म्हणजे “मविआ” महाराष्ट्र राज्य.
वाझे, मनसुख हिरेन खूनाचे प्रकरण, ६.५ जीबी डेटा प्रकरण, १२५ तासाचा व्हिडिओ पेन ड्राईव्ह प्रकरण, शेतकऱ्यांवरील अन्याय, खुद्द दोन मंत्रीगण सध्या गजाआड होणे, खुद्द माजी गृहमंत्र्याचे गजाआड होणे ते सुद्धा १०० कोटी वसुली वाझे प्रकरणातून आणि पर्यायाने चौकशी मध्ये मिळालेल्या अनैतिक मार्गाने कमविलेल्या पैशाखातर त्यांची मुले त्यात गोवले जाऊन – मुलांची सुद्धा चौकशी साठी घेतले गेलेली दखल. गुन्हेगारी साबित झाली नसली तरी आरोपी इतके दिवस गजाआड होणे – ह्याचे महत्व हे ही नसे थोडके.
दुसरे मंत्री नवाब मलिक – ह्यांचे थेट संबंध दाउद इब्राहीम शी निघाले आणि सामान्य लोकांना सामान्य वाटणारी जमिनीची जागा – मलिकांचे खरे स्वरूप उघड करुन गेली. त्यांना पण गजाआड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
ईडी ईडी ईडी – सीबीआय सीबीआय सीबीआय च्या नावाने खुप हो हल्ला होतोय. सरकारी यंत्रणेचा मविआ सरकार विरुद्ध गैरवापर होतोय ही हाकाटी पेटवली जातेय. उगीच मान्यवर निष्पाप नेत्यांना गजाआड नेण्याचा अक्षम्य गुन्हा केंद्र सरकार करते आहे अशी जनमानसात प्रतिमा केंद्र सरकारची डागाळण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. पण केंद्र सरकार पुराव्या अभावी कारवाई करीत नाही. एवढे सत्य लोकांच्या गळी उतरले आहे. कारण……
न्यायालयीन प्रक्रियेत मविआ सरकार विरोधात सर्व निकाल लागले. ह्या उलट देवेंद्र फडणवीसांनी १२५ तासांच्या व्हिडिओ चा पेन ड्राईव्ह केंद्र सरकारला सुपुर्द केला. पेन ड्राईव्ह मध्ये भाजपा महाराष्ट्र शीर्ष नेतृत्वावर नकली, फेक आरोप पत्र दाखल करुन त्यांना अजामिनपात्र गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात पाठविण्याचे षडयंत्र उघड झाले आणि मानसिक स्वास्थ्य शोधत घरामध्ये बसलेले – महाराष्ट्र जनतेप्रती निश्चिंत मुख्यमंत्री ईडी सारखा घरगडी सासरी कामाला लागल्याचे बघुन, जनतेसाठी नव्हे तर स्वतः ची सासरची माणसे वाचविण्यासाठी मर्जीविरुद्ध घराबाहेर पडला. कदाचित मुख्यमंत्र्यांना सासर पेक्षा ईडी आपल्या घरात येवून आपली रवानगी पण देशमुख किंवा नवाब मलिकांच्या सारखी होते का काय? ही भिती सतावित असावी. जनतेच्या घामाने डबडबलेल्या करयुक्त (Tax) पैशाने असणारी स्वतः ची भलीमोठी टोलेजंग घरे, घरात चालणारे वातानुकूलित यंत्रे, घरी नोकर चाकर, व्याजमुक्त कर्जाने घेतलेल्या मोठ मोठ्या गाड्यांनी फिरण्याची सवय. त्यात मामु ( माननीय मुख्यमंत्री) झाल्यावर सरकारी ताफ्यात फिरण्याची सवय. जनतेच्या पैशावर ऐषोआराम करणारा आमचा मुख्यमंत्री, घरगडी सासरी दार ठोठावताच खडबडून जागा झाला. आपल्याला पण साळ्यासहीत जेलमध्ये झोपण्याची वेळ आली तर! विचारांनी कापरं भरलं आणि वाझे, देशमुख, मलिक, अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सामिल गुन्हेगारांना पाठीशी घालणारे मामु एकदम कार्यरत झालेत.
सरकारी यंत्रणा कशी चालते! माहिती नसणारा – अनभिज्ञ मुख्यमंत्री. कुठले खाते महत्वाचे! ह्याची जाणीव नसणारा मुख्यमंत्री! केवळ एक नारा – मुख्यमंत्री हमारा! मग राजकारणात तर अशा बिनडोक पदांना अनन्यसाधारण महत्व. जे महत्त्व कॉंग्रेस मध्ये गांधी घराण्याला – तेच् महत्व आताशा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या सूपुत्राला. भव्यदिव्य बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धज्जिया उडविण्याचा प्लॅन कदाचित “घरका भेदी लंका ढहाए” सम-पादकाचा असावा. जाणता राजा चे पाय पकडून, एक तळ्यात एक पाय मळ्यात ठेवून सम-पादक ने शिवसेना संपविली. मुख्यमंत्री घरात झोपवला आणि राज्यावर चे नियंत्रण कंट्रोल करण्याचे काम समयाधीशांकडे आले. समयाधीशांचे हाती “गृहमंत्री” पद आहे. वित्त मंत्री सुद्धा शिवसेने कडे नाही. “कॉमन मिनिमम प्रोग्राम” सर्व महत्वाची खाती सोडून, हट्टापायी हव्यासापोटी मुख्यमंत्री पदी विराजमान झाली आणि महाराष्ट्र राज्य अनियंत्रित नेतृत्वामुळे भरडले गेले.
मामु ( माजी मुख्यमंत्री) फडणवीसांनी सत्तेबाहेर राहुन सत्ताधाऱ्यांची कशी वाजवता येते हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले तर सम-पादक शिवसेनेचे म्हणणे असे आहे की भाजपा महाराष्ट्र शीर्षस्थानी असणाऱ्या नेत्यांचे घोटाळे पुराव्यानिशी गृहमंत्री पाटील यांना दिले आहेत पण गृहमंत्री पाटील किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपाच्या नेत्यांवर कारवाई करीत नाही एवढेच् नव्हे तर राकॉं चे भाजपा प्रती मवाळ भूमिका आहे. सबळ पुरावे असते तर गृहमंत्री खाते, हातावर हात धरून बसले असते काय? म्हणजेच् शिवसेना कारण एक सांगत आहे तर मुख्य उद्दिष्ट काही दुसरे असावे. असे म्हणण्यास हरकत नाहीं.
मित्र हो! सम-पादक जो समयाधीशांच्या ताटाखालचं मांजर आहे. ज्याचा बुद्ध्यांक समयाधीशांना समजायला “शंभर जन्म” लागतील एवढा बाटुकला. ज्याला आता आता साक्षात्कार झाला की समयाधीश आत्ताचे “भीष्म पितामह” ह्या भौ (भौ म्हणजे भूभूत्कार – रात्री राजकीय गांजा मारला की सकाळी सकाळी मिडिया समोर गरज नसताना ओकलेली गरळ) ला कुठल्या ज्ञानातून अशा कल्पना सुचतात देव जाणे! “जाणता राजा ते भीष्म पितामह” हा प्रवास अडीच वर्षांचा. आपला राकॉं चा बालेकिल्ला शाबूत कसा ठेवायचा? ह्यासाठी प्रतिबद्ध ,”भीष्म पितामह” आणि ह्या सम-पादक भौ ला आज जाग आली. मविआ मधील असंतुष्ट आमदारांना एकसंध बांधणे गंमतीचे काम नाही. अर्थ संकल्पात राकॉं ला ६०%, शिवसेनेला केवळ १५% तरीही कोणाच्या तोंडावर ऊफ नाही. भीष्म पितामह समयाधीश ह्यांनी असा काय चमत्कार केला की शिवसेना चूप्प! शेवटी फडणवीसांनी सांगितले की शिवसेना तुमच्यावर अन्याय झालाय, त्यानंतर थोडी हलचल मग सगळे आलबेल! पण सम-पादक खदखदत होते, मामु खदखदून राहिला. असं काय झाले? की खदखद धुसफूस करते आहे.
वाचकांनो वळु या – मुख्य मुद्दा – गृहमंत्री खाते आता शिवसेना का मागते आहे? मुद्दे की बात –
राणे कुटुंबीय सतत त्यावेळी “पेंग्विन – पेंग्विन – पेंग्विन” चा धोशा लावित होते. दिशा सालियान पाठोपाठ सुशांत सिंग ची हत्या / आत्महत्या झाली. Narcotics ची मोठ मोठी नावे गोवल्या गेली. बॉलिवूड सिताऱ्यांची चौकशी सुरू झाली आणि मग पुढे पुढे बघता ह्या केस बद्दल प्रगती बाहेर आली नाही आणि मिडिया ने टीआरपी मिळत नाही म्हणून हा मुद्दा टीव्हीवर येणे बंद झाले. कदाचित अजून काही कारणं देखील असू शकतील. पण ह्या सर्वात एक मुख्य मुद्दा सुटतोय आपला! तो म्हणजे !!!!!!!!
राणे कुटुंबीय त्यावेळी म्हणाल्या चे आठवत असेल तर …. राणे कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचा DNA ज्याला पेंग्विन नावाने ओळख दिली त्याची उपस्थिती दोन्ही हत्या/आत्महत्या च्या वेळी. गंमत म्हणजे परमबीर सिंग ह्यांच्या निगराणी खाली सुरु असलेल्या तपासातील मोठे धागे म्हणजे सुशांत सिंग ह्याच्या लॅपटॉप मधील सर्व डेटा अनावधानाने डिलीट झाला. अशा बातम्या बाहेर येतात ह्याचा अर्थ असा की कदाचित मांडवली झाली असावी – डेटा आपापसात साझा करण्यात आला. आणि खऱ्या घडलेल्या घटनेपासून जनतेला अंधारात ठेवले गेले असावे. पण वास्तविक तो डेटा परमबीर सिंग – गृहमंत्री खाते – भीष्म पितामह ह्यांचे जवळ तर असणारंच् असणार. उगीच का शिवसेना प्रत्येक गोष्टीला होकार देते समयाधीशाच्या होकारात हो लावते?
ह्या दोन घटनांची खरी मिमांसा करायची असेल तर ज्या गोष्टींचा तपास सुरू आहे, त्यातील महत्वाचा डेटा डिलीट कसा होवू शकतो? आणि ज्या कर्मचाऱ्याच्या हातून असा महत्वाचा पुरावा डिलीट झाला त्या कर्मचाऱ्याला सस्पेंड का करण्यात आले नाही? राणे कुटुंबीयांवर “पेंग्विन” ची उपस्थिती आहे. म्हटल्यावर त्यांच्याकडून पुरावे मागण्याची गरज होती. आणि सबळ पुरावे दिले नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. पण मविआ सरकार, गृहमंत्री खात्याने अशी काही ही कारवाई न करता. हा विषय थंड्या बस्त्यात ठेवण्यात आला! असे का? “भीष्म पितामह” ह्यांनी मविआ सरकार बिखरू नये ह्यासाठी काय खेळी केली असेल? माझ्या त्यावेळी यु ट्यूब चॅनेल वर http://sadetod.com मी एका एपिसोड मध्ये सांगितले सुद्धा आहे.
ह्या मध्ये एक विश्लेषणात्मक तथ्य असे असू शकते!
त्यावेळी सुशांतसिंग प्रकरणात जो डाटा डिलीट झाला असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा डाटा इतका सबळ पुरावा म्हणून वापरण्यात आला असता तर शिवसेना मधील काही महत्वाची व्यक्ती गोत्यात आली असती. सरकार कदाचित कोसळले असते. म्हणून जी केस पोलिसांनी तपास करायची तिथे रोज रोज सम-पादक, मामु, समयाधीश ह्यांची वेळोवेळी येणारी विधानं. हा पण एक समर्पक, सबळ पुरावा. पण हा सबळ पुरावा डिलीट झाला म्हणजे काय तर? हा पुरावा सर्व सामान्य जनतेसमोर आला नाही. पण निश्चितपणे हा पुरावा परमबीर सिंग, गृहमंत्री खाते पर्यायाने हा पुरावा समयाधीशांकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भीष्म पितामह समयाधीश ह्यांनी आपली खेळी अचूक खेळली आहे.
डरकाळी फोडणाऱ्या वाघाची भिती असणार की छावा सुरक्षित राहावा ह्या साठी मामु शांत. हा एक जनतेसाठी डिलीट झालेला सबळ पुरावा समयाधीशांचा प्रवास “जाणता राजा ते भीष्म पितामह” ठरला.
वरकरणी कोणतेही कारण दाखविली जात असली तरी – मामु आणि सम-पादक आता हा सबळ पुरावा हस्तगत करण्यासाठी गृहमंत्री खाते आपल्याकडे घेण्यासाठी आतुर असावे, जेणेकरून जो काही सबळ पुरावा असेल तो पुर्णपणे हस्तगत करण्याची तयारी शिवसेनेने चालविली असावी. जेणेकरून राकॉं समोर नेहमी नेहमी खाली मान घालून उभे राहण्याची वेळ येवू नये. १५% अर्थ संकल्पाचे फार कमी होतात? आमदार शिवसेशेचे रडकुंडीला आले, त्यांचे डोळे कोण पुसणार? आता काही तरी करायला हवे – कसे ही करुन गृहमंत्री पद घ्यायला हवे.
असा कयास आहे. असे एक विश्लेषण.

भाई देवघरे

Leave a Reply