६ वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय इलेक्ट्रिशियनने केला अत्याचार

नागपूर : ३१ मार्च – शहरात सहा वर्षाच्या चिमुकलीवर जबरी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. घरी कुलर दुरुस्तीसाठी आलेल्या इलेक्ट्रिशियननं हा प्रकार केलाय. देवदास नामदेव वाघमारे असं या नाराधमाचं नाव आहे. देवदास वाघमारे हा 60 वर्षांचा आहे. चिमुकली फक्त सहा वर्षीची आहे. चिमुकलीची आजी आणि आई दोघेही कामासाठी बाहेर गेले होते. कुलर दुरुस्तीसाठी देवदास आला होता. 29 मार्च रोजी दुपारी तो त्यांच्या घरी कुलर आला. चिमुकलीची आई आणि आजी कामावर गेल्या होत्या. देवदासची वाईट नजर चिमुकलीवर गेली. तिला त्याने घरात आणले. आतून दार बंद केले. यानंतर या नरधमाने तिच्यावर अत्याचार केला. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. देवदास कुलर दुरुस्त (Cooler Repair) न करताच निघून गेला. चिमुकलीची आई आणि आजी संध्याकाळी घरी परतल्या. चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आई आणि आजीने अजनी पोलीस (Ajni Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Leave a Reply