जनआक्रोश ट्रॅफिक स्कूल’ चे  2 एप्रिल रोजी उद्घाटन

नागपूर : ३१ मार्च – रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी दीड लाखहून अधिक लोकांचे मृत्यू होतो. हा मृत्यू दर कमी करण्यासाठी जनआक्रोश मागील अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्य करीत आहे. या प्रयत्नातील पुढचे पाऊल म्हणून जनआक्रोश या संघटनेने ‘जनआक्रोश ट्रॅफिक स्कूल’ सुरू केले आहे. ट्रॅफिक स्कूलमध्ये माध्यमिक शाळांमध्ये व महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यांना जनआक्रोशचे शिक्षक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहेत.
‘जनआक्रोश ट्रॅफिक स्कूल’चे उद्घाटन शनिवार, 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ट्रॅफिक पार्क, धरमपेठ येथे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची प्रमुख उपस्थिती राहील तर पर्सिस्टंट सिस्टीम्स प्रा. लि. चे चिफ पिपल ऑफीसर समीर बेंद्रे यांची कार्यक्रमाची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लदधड व सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी केले आहे.

Leave a Reply