भाजपवाल्यांनी खोटं किती बोलायचं याच्या सीमा गाठल्या आहेत – नाना पटोले

नागपूर : २९ मार्च – भाजपच्या केंद्रातील सरकारने या देशातील गरीब आणि सामान्य माणसाचा जगणं मुश्किल करण्याचे ठरवले आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात इंधनाच्या किमती वाढल्या नाही. भाजपवाल्यांनी खोटं किती बोलायचं याच्या सीमा गाठल्या आहेत, असाही खरपूस समाचार पटोले यांनी घेतला. पटोले म्हणाले, काँग्रेसमुळे पेट्रोलचे दर वाढले असं काँग्रेसची सत्ता असताना भाजपवाले म्हणायचे. खोटं बोलायला यांची जीप कशी धास्तावते, हा मोठा प्रश्न आहे. यांना केंद्रामध्ये सत्ता चालवायची नसेल आणि महागाईमुळे जनतेला संपवायचं असेल तर त्यांनी सांगावं. सत्ता काँग्रेस चांगली चालवू शकतं. आता जनतेची मानसिकता झाली की, काँग्रेसच चांगली होती. तातडीने केंद्रातल्या भाजप सरकारने हा महागाईचा भस्मासुर आता संपवावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.
नाना पटोले म्हणाले, 31 तारखेपासून आम्ही सप्ताह साजरा करणार आहोत. राज्यभर आणि देशभर या आंदोलनाची सुरुवात करतो आहोत. देशभरातील जनतेसमोर भाजपचा खोटा चेहरा आणणार आहोत. महागाई वाढतच राहील. देश विकणार या पद्धतीचा भाजपनं सांगावं. आदरणीय प्रधानमंत्री जे करत आहेत, ते महागाई वाढवून लोकांना त्रास देणार आहे. लोकांचा रोजगार हिसकावून घेणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव न देणे असे त्यांच्या खासदारांनी देशांमध्ये जाऊन सांगावं, अशीही टीका त्यांनी केली.
नाना पटोले यांचे घोटाळे बाहेर येणार ही भीती वाटत आहे. त्यामुळं नाना पटोले वारंवार असे बोलत असतात. असा टोला आमदार परिणय फुके यांनी पटोले यांचे नाव न घेता लगावला. भाजपची काळी जादू चालणार नाही. या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर ते बोलत होते. आम्ही सत्तेत येणार आम्ही कधीच बोललो नाही असे ते म्हणत होते. या तिन्ही पक्षात आपसात भांडण सुरू आहे. तिन्ही पक्षांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. म्हणून त्यांना भीती वाटत आहे. ते स्वत:ला डिफेंड करत असल्यामुळे असे वक्तव्य सतत करत असल्याचे परखड मत फुके यांनी व्यक्त केले.

Leave a Reply