मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

कानाचे कच्चे….

आपणास ठाऊक असेल की, पूर्वी इतिहासात राजे, सेनापती जे शूरवीर होते त्यांच्यात शब्दांना खूप महत्त्व असायचे. जीव गेला तरी शब्द कधी मोडत नव्हते.
आपल्या शब्दांना नेहमी किंमत असावी. पण आजच्या ह्या कलियुगात शब्दांना काहीच किंमत नाही. जे डोळ्यांनी दिसत ते बोलण्याचा माझा प्रयत्न. शपथ, वचन, प्रतिज्ञा ह्या शब्दांना काडीमोल किंमत राहिली नाही. माहिती का, आपल्या नात्यात आपल्या संबंधात दुरावा येण्याचे कारण हेच की, माणूस जसा बोलतो, शब्द देतो ते तो पाळत नाही. कधी कधी काहीही कारण नसताना माणूस खोटं बोलतो. माणूस अस का वागतो? काय कारण असावं? एकतर त्याला समोरच्याशी खोटं बोलून मजा येत असेल किंवा आनंद मिळत असेल.
लहानपणाची एक गोष्ट मला आजही आठवते, मी आईसोबत खोटं बोलली, त्यावेळी आईचा ओरडा आणि धपाटा मिळाला. तेव्हापासून ती एक शिकवण मला मिळाली. खोटं बोलयाच नाही. आजही कोणी खोटं बोलल की मला चीड येते. पण कधी कधी चांगल घडण्यासाठी खोटं बोलाव लागत. जर त्यातून काही चांगल घडतं असेल तर तेवढं खोटं चालून घ्यावं लागतं.
दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास. हा शब्द जरी छोटा असला तरी त्यात संबंधाचे खूप मोठे गांभीर्य आहे. एखादी आपल्या हातून वस्तू पडली की तुटते, त्याचा आवाज होतो पण विश्वास हा तुटला तर त्याचा आवाज कोणाला ऐकू येणार नाही. पण संबंध हा कायमचा तुटून जातो. म्हणून आज प्रत्येकाने विश्वासाचे नाते जपायला हवे. त्या गोष्टी इमानदार असायला हव्यात. जे आपण करू शकत नाही ते आश्वासन समोरच्याला देऊ नये. कारण ह्या आश्वासनानी तो आपसूकच त्यात गुंतून जातो आणि जिथे तो गुंततो ती भावना मग तुटते आणि त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आपल्यामुळे समोरचा कधीही दुखी होता कामा नये. साध्या साध्या गोष्टीत माणूस चुकत जातो पण तो काय चुकतो हेच त्याला कळत नाही.
आज जर आपण कोणाचा विश्वासघात केला तर हीच वेळ उद्या आपल्यावर ही येऊ शकते हे फक्त लक्षात ठेवाव. समोरचा कसा वागतोय याकडे कानाडोळा करून आपण समोरच्याचे किती चांगले करू याचा विचार त्यांनी करावा.
आपल्या युगात खूप महान लोक होऊन गेले आपण त्यांचे चांगले गुण घ्यायला हवे. आपण जेव्हा एखाद्याला शब्द देतो तो आपण पूर्ण करतो. त्यामुळे मनाला एक प्रकारचे समाधान मिळत. आपण कोणाची फसवणूक नाही केली ह्याचे समाधान मिळते. पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या भावनाशी खेळतो तेव्हा आपले मन आपल्यालाच खातं. ‘ अरे देवा, हे आपण काय केलं त्याला किती दुःख झाला असेल’ खूप चिंता वाटत राहते
आपण असे एखादे चांगले काम करावे की समाजात तुमचे स्थान राहील. तुम्ही लोकांच्या मनात Goodweel बनाल तेव्हाच तुम्ही तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करू शकाल.

पल्लवी उधोजी

Leave a Reply