दहावीचा पेपर सुरु असताना बुलढाण्यात मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला, १३ विद्यार्थी जखमी

बुलडाणा : २८ मार्च – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व शाळा महाविद्यालय सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या दहावीच्या परीक्षा सद्धा सुरू आहे. पण, बुलडाण्यात पेपर सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात 13 विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन कॉन्व्हेंट शाळेत ही घटना घडली. आज दहावीचा पेपर असल्याने विद्यार्थी गजानन कॉन्व्हेंट या शाळेत पेपर देण्यासाठी दाखल झाले होते. सकाळी वेळेवर पेपर सुरू होणार म्हणून सर्व विद्यार्थी वेळेवर हजर होते. पण अचानक अचानक मधमाश्याने विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे नेमकं काय घडतंय हे कळायला मार्ग नव्हता. विद्यार्थ्यांची एकच धावपळ उडाली.
मधमाशांचा हल्ला रोखण्यासाठी विद्यार्थी इकडे तिकडे पळत सुटले होते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मधमामाश्यांच्या हल्ल्यात तब्बल 13 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना उपचारार्थ शेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मधमाशांचा हल्ला झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply