अ.भा.सा.प. अध्यक्षपदी प्रा.प्रवीण दवणे यांची निवड…..

नागपूर : २८ मार्च – अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धी साठी कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या प्रदेश अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली आहे. दि.27 मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते प्रा.दवणे यांची निवड करण्यात आली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी प्रविण दवणे यांचे नाव सुचवले व संघटन मंत्री श्री. सुनील वारे यांनी दवणे सरांच्या नावास अनुमोदन दिल्यावर उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिली. अखिल भारतीय साहित्य परिषद 1966 पासून साहित्य क्षेत्रात, राष्ट्रीय विचार घेऊन सर्व भारतीय भाषांमध्ये कार्यरत आहे. अ.भा.साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील कामाला दवणे सरांच्या नेतृत्वामुळे साहित्यिक उंची प्राप्त होऊन सर्व जिल्ह्यात काम नव्याने गती घेईल . याच बैठकीत प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांची कार्याध्यक्ष पदी, तर श्री. नितीन केळकर यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्रा.डॉ. बळीराम गायकवाड यांचे कडे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तर श्री. सुनील वारे यांचे कडे प्रदेश संघटना मंत्री अशी जबाबदारी असेल. नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्त्या या पुढील एक वर्षा साठी असतिल.

Leave a Reply