मोबाईल फोडल्याच्या कारणावरून मजुराची हत्या

नागपूर : २५ मार्च – नागपूर शहरात आल्या दिवसाला हत्येच्या घटना रोजच्याच झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. केवळ मोबाईल फोडल्याच्या कारणावरून एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. सल्लूराम ऊर्फ रिंकूकुमार (वय ३१) असे मृतक मजुराचे नाव आहे.
उत्तर प्रदेश येथे राज्यात राहणारे रिंकूकुमार, आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक हे मागील दोन वर्षांपासून नागपूर शहरातील एका प्लास्टिक वितळविण्याच्या कारखान्यात आहे. वाठोडा पोलिस ठाणे हद्दीतील बीडगावमध्ये रेणुका माता मंदिर परिसरात हा कारखाना आहे. या कारखान्यात एकत्र कामावर असले तरी त्यांचे राहण्याचे ठिकाण हे वेगवेगळे आहेत. काही अंतरावरच ते राहत असल्यामुळे त्यांचा आपसातही संपर्क येतो. दरम्यान, ते कामावरून घरी परतले. त्यानंतर रात्री मध्यरात्रीच्या सुमारास रिंकूकुमार याने त्यांच्याच सोबत काम करणारा विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून घरी बोलण्याकरिता मोबाईल घेतला. घरी बोलणे झाल्यानंतर त्याने तो फोन परत केला. परंतु, यानंतर कॉल करण्याच्या कारणावरून विधीसंघर्षग्रस्त बालक आणि रिंकूकुमार यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रिंकूकुमारने विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या हातून मोबाईल हिसकत तो जमिनीवर जोरात आपटला. यात मोबाईल फुटला. त्यानंतर गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास रिंकूकुमार आणि विधीसंघर्षग्रस्त बालक हे दोघेही अन्य कामगारांसह कारखान्यात कामाला जाण्यासाठी निघाले. यावेळी प्रदीपकुमारने रिंकूकुमारला मोबाईल फोडण्याचे कारण विचारले. परंतु, रिंकूकुमारने त्याला सांगण्यास टाळाटाळ केली. रिंकूच्या न सांगण्याचा विधीसंघर्षग्रस्त बालकाला राग अनावर झाला आणि त्याने जवळच पडलेल्या काठीने रिंकूवर हल्ला चढविला. काठीचा डोक्यावर जबर मार बसल्यामुळे रिंकू रक्तबंबाळ झाला. जखमी अवस्थेत पडलेल्या रिंकू कुमारला त्याने तत्काळ खोलीत नेले आणि येथे त्याच्या डोक्याच्या जखमेवर हळद, पट्टी केली. त्यानंतर तो रिंकूला खोलीत आराम करण्यासाठी सोडून कामावर निघाला. परंतु, डोक्याची जखम मोठी असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कारखान्यात काम करणार्या काही कर्मचार्यांना कळल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील माहिती ही वाठोडा पोलिसांना दिली. पोलिसांनी बालकाला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply