आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून घेतलेला निर्णय – चंद्रकांत पाटील

मुंबई : २५ मार्च – अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 300 आमदारांना घरं बांधून देणार अशी घोषणा केली आहे. या घोषणेवरून राज्यभरात एकच चर्चा रंगली असून भाजपनेही यावर आक्षेप घेतला आहे. ‘आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेतला आहे’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
अधिवेशनात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
कल्याणकारी राज्याने पाच गोष्टी लोकांना तोट्यात जाऊन कराव्या लागतात. या गोष्टी देण्यापासून सरकार हात झटकू शकत नाही, मुलं पायी प्रवास करत आहेत. अनिल परब फक्त बैठका घेत आहेत’, अशी टीकाही पाटील यांनी केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर तुमचा विश्वास नाही. ज्या संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली, एक नेता राहिला नाही. वाट लावण्याचे कंत्राट संजय राऊत यांनी घेतले आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.
तर दुसरीकडे, आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टीकास्त्र सोडले आहे.
‘आपण सभागृहात आमदारांना मोफत घरे देणार असा निर्णय जाहीर केलात. निर्णयाला विरोध असण्याचा कारण नाही. देशाच्या सीमेवर मातृभुमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडणाऱ्या शहीद सैनिकांच्या लहान कच्चाबच्चांना, त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना, त्यांच्या निराधार विधवा पत्नीला, ज्याच्या डोक्यावर छत नाही अशा कुटुंबांना अगोदर मोफत घरे देणार? की सरकार म्हणून आधी स्वत:चच भल म्हणत आमदारांना देणार? कोविड काळखंडात स्वत:चा जीव धोक्यात घालत ज्यांनी स्वत:चे प्राण गमावले. कोणतीही स्वत:च्या कुटुंबाची चिंता न करता लोकांची सेवा करताना ज्या डॉक्टरर्स, नर्स, कंपाऊंडर, पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी, नगर पालिका, महानगर पालिका कर्मचारी वर्ग यापैकी अनेकांनी लोकांची सेवा करताना आपले प्राण गमावलेत. खऱ्या अर्थाने ते देखील शहीदच आहेत, मुख्यमंत्री महोदय आपण आणि आपले सरकार मोफत घरे देताना त्यांचा प्राधान्याने विचार करणार की कोणाचा करणार? असा सवालच कदम यांनी केला.

Leave a Reply