सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

चमकणाऱ्या राजकारण्यांची घसरती अस्मिता

नोव्हेंबर २०१९ कोण विसरू शकेल महाराष्ट्रात? सत्तेपेक्षा मला मुख्यमंत्री पद पाहिजेनं! ह्या हट्टापोटी मतदारांना वेठीस बांधून, जयचंदी रंगात रंगून, हिंदू मतदारांचा अपमान करुन, विश्वासघाताचे पातकाचा कलंक लेवून, भगव्याशी प्रतारणा करीत, असंगाशी संग करीत, दोन दादल्यांचा धनी दोन वर्षात थकला आणि कोरोनाचे नावाखाली जो उरफाटला घरात बसला ते तब्येतीच्या नावाने आज देखील घरातून कारभार बघत़ोय, अगदी ईडी घरापर्यंत पोहोचते आहे तरीही.
मुळात “आम्हाला पण पक्ष चालवायचा आहे” असे विधान महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या ऊद्धव ठाकरेंचे विधान आले, तेव्हाच् लक्षात आले की काहीतरी मोठा घातपात घडतोय. असे म्हणायला हरकत नसावी की अधिकारीक रित्या शिवसेनेने भाजपा शी युती करून जागा लढविण्यासाठी भाजपा ला जागेबाबत बांधून टाकले १६३ जागी लढली पैकी एकूण १०५ जागा जिंकून आले म्हणजे भाजपा एकहाती सरकार देऊ शकणार नाही ही व्यवस्था करण्यात आली. आणि अनधिकृत छुपी युती शिवसेनेने समय के साथ केली असावी.
टीव्ही, मिडिया वर ह्या मामु चा (माननीय मुख्यमंत्री) खुप उहापोह झाला. सतत नाटकं केली गेली आणि शेवटी शिवसेनेने खापर अमित शहांवर फोडले आणि २५ वर्षांची युती मोडीत निघाली आणि पंज्याच्या खाली मनगटावर घड्याळ बांधून शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिवधनुष्य पेलायला सज्ज झाला. आता ह्याने शिवधनुष्य पेलले की शिवधनुष्याने मामु ला पेलले. हा आपापल्या विचारसरणी चा स्वतंत्र विषय.
मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकारात माझा रोष आहे तो भाजपा वर. अरे, तुमच्या युतीतील साथीदार, तुमचे मतदार घेऊन, तुमचा मतदानाचे वेळी कुबडी सारखा उपयोग करणार आणि मतदानानंतर सत्तेसाठी तुम्हाला लाथ घालून सत्तेबाहेर करणार! एवढे मोठे राजकारण ताटाखाली शिजते आहे आणि तुम्हाला साधा मागमूस असू नये. आपली धावपळ चालली होती ते महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी. युती सहकाऱ्याला सत्ता देण्यासाठी नव्हे. हा भाजपा बद्दल खल तर जन्मभर डोक्यात राहणार.
मात्र सत्ता आल्यानंतर मामु नी माफी मागुन पहिली अट मामु (माजी मुख्यमंत्र्यांना) घातली की बॉ! मला सगळे शिकायला सहा महिने तरी द्या! आणि मामु (माननीय मुख्यमंत्री) ने घातलेली अट मामु (माजी मुख्यमंत्री) ने मान्य केली. जय जय महाराष्ट्र माझा ! गरजा महाराष्ट्र माझा! महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या टोकाच्या भुमिका बजावल्यानंतर दोन्ही मामुंनी इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात बजावलेली भूमिका निश्चित पणे कौतुकास्पद आहे.
पण तुम्ही ज्या खुर्चीवर बसताय! त्याखालचे काटे बघितलेत का हो? ज्या पक्षाबरोबर तुमची युती होते आहे, नव्याने नाव जोडले आहे त्याचा इतिहास बघणे क्रमप्राप्त असते. पण भाजपा विविध योजना आणते हजारो करोड ओतल्या जातात आणि योजनेतील पैसा सरळ सरळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविले जातात आणि मध्ये आमचे काय? तर ,”आम्हाला पण पक्ष चालवायचा आहे” हे वाक्य ज्यावेळी शिवसेना नेतृत्व म्हणजे तर ह्या वाक्यात भाजपाचे कामकाजाचे स्पष्ट रुप बघायला मिळते.
भाजपा सरकारचा पाच वर्षे काम करण्याचा कालावधी बघा. देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आणलेल्या योजनांना आर्थिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सबळ, सढळ हाताने मदत केली आहे. पाच वर्षात कुठले ही भ्रष्टाचाराचे आरोप ह्या माजी मुख्यमंत्र्यावर लागले नाही आणि महाराष्ट्र हिताचे निर्णय घेऊन कार्यान्वित केल्या गेले. महाराष्ट्रात कामे कशी करायची ते कुठली शासकीय यंत्रणा कशी राबवायची ह्याचे यथार्थ ज्ञान असणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस.
ह्या उलट मला सहा महिने द्या म्हणून वेळ मागणारा अनाडी मुख्यमंत्री, ह्यांनी फक्त खुर्चीला मिळणारा मान बघितला, रुबाब बघितला आणि संधीसाधू धोरण व्यवस्थित पार पडले आणि उद्धवसाहेब खुर्चीत विसावले.
फक्त एका हट्टासाठी संपूर्ण शिवसेनेला दावणीला बांधले, महाराष्ट्र जनतेची फसवणूक केली आणि आता तर शिवसेना भगव्या रंगातून बाहेर पडली आणि स्वतः चे स्वत्व हरवून हिरवा पंचा कमरेला गुंडाळून बसली आहे. आता महाराष्ट्र जनतेची पिळवणूक सुरू आहे. ह्यांना साध्या परिक्षा घेता येत नाही. हे कसे महाराष्ट्रातील जनतेच्या परिक्षांना खरे उतरणार? खऱ्या अर्थाने “कोरोना सरकार”!
राजकारण आता पुर्वी सारखे नाही राहिले. जनतेची विश्वासार्हता गमावलेले नेते. प्रसारमाध्यमांसमोर काय बोलतात आणि वास्तवात काय करतात! फार मोठी तफावत आढळते. आलेली संधी खरे तर शिवसेनेने दाखवून द्यायला हवे होते की आम्ही भगव्या रंगात ही रंगलो आहोत आणि जनकल्याणाची कामे आमचे पहिले लक्ष. जनकल्याणाचे मानकरी आहोत. मात्र “संग संगती दोष:” बरोबरीचे मित्र बरोबर नसले की चारित्र्य आपले नासवून टाकतात. त्यावेळी सुद्धा अमिताभ बच्चन वर बोफोर्स दलालीचे लांछन लावून माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी आपल्या मैत्रीचा परिचय दिला होता. ह्या उक्तीला बळी पडलेला पक्ष म्हणजे “शिवसेना”.
मामु देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता कसा असावा? ह्याची चुणुक दाखविली आणि सत्ताधारी पक्षाला त्याची धास्ती वाटायला लागली. खरे म्हणजे जेव्हा “व्हिसल ब्लोअर” जेव्हा एखादा विषय मांडतो त्यावेळी विषयातील तथ्य लक्षात घेऊन त्या तथ्याला न्याय मिळेल अशी प्रकारची दिशा देणे, कारवाई करीत कार्यरत होणे, मविआ सरकारकडून अपेक्षित होते. मात्र संपादक राऊत ह्यांनी रोज सकाळी पत्रकार परिषद – नको असलेल्या घेऊन. जनतेचा रोष स्वतः वर ओढवून घेतला. संयुक्तिक विचार मांडले असते तर कदाचित लोकांना ह्या प्रातर्विधी परिषदा आवडल्या असत्या. पण विरोधी पक्षावर चिखलफेक करायची आणि आपलीच् टांग वर करायची ह्यात महाराष्ट्रातील जनतेला स्वारस्य नव्हते. त्यांचे प्रश्न होते ते “कोरोना काळात झालेली हानी, सरकार कसे भरुन काढणार?” “कोरोना काळात झालेली शिक्षणाची दैना सरकार कसे भरून काढणार?” “शेतकऱ्यांसाठी जे समयाधीश शेताच्या बांधावर जाऊन जाऊन शेतकऱ्यांचा मित्र होवून, शेतकऱ्यांचे मित्र असल्याचा आव आणत, सरकार बनविण्याचा दावा ठोकत होते! सरकार बनविल्या नंतर मात्र ढुंकूनही न बघणारे मविआ सरकार ने जनतेला सर्व कक्षांमध्ये तोंडघशी पाडून, स्वतः चा स्वार्थ बघण्या पलिकडे काही काम केले आहे असे सध्यातरी वाटत नाही.
विधान सभेचे अधिवेशन आले की मुख्यमंत्र्यांना घाम फुटतो! हे चित्र देखील महाराष्ट्राने पहिल्यांदा अनुभवलेले. एक अधिवेशन “वाझे ने गाजवले” वेळीच घटनांची दिशा बदलून शिवसेना स्वाभिमानी मार्गावर परत आली असती, मोदींना”हमका माफी दै दो!” म्हणत परत आली असती तर बरेच् काही साध्य होवू शकले असते. कदाचित सत्ताधीशांनी शिवसेनेचा परतीचा दरवाजा पण बंद केला असावा. राणे कुटुंबीय जसे म्हणतात की दिशा सालियान प्रकरणात मामु च्या पोराचा हात आहे. कदाचित गृहमंत्री खाते असणाऱ्या समयाधीशांकडे त्या नष्ट झालेल्या पुरावे असावेत, कदाचित परमवीर सिंग ने देखील हे पुरावे जतन केले असावेत व नंतर चुकुन अधिकारीक रित्या चुकुन नष्ट झाल्याचे सांगण्यात आले. असे पण होवू शकते. आपला एक कयास.
पण वाझे च्या अटकेने मविआ सरकारचे बिंग फुटले आणि भ्रष्टाचाराचा भोपळा फुटला. आणि मविआ सरकार वसुली सरकार आहे ही संकल्पना जनमानसात रुजू झालेली. भ्रष्टाचाराचे बिंग फुटू नये म्हणून त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पायमल्ली केली. तरी मविआ सरकार वसुली सरकार त्याला दुजोरा देत गेली. आणि संजय राऊत मिडिया वर वाझे ची तारीफ करण्यात मग्न होते. वेळीच् पाउले उचलली गेली असती तर मुख्यमंत्र्याला घरात बसायची वेळ आली नसती.
दुसरा बॉंब टाकला तो ६.५ जीबी डेटा – ह्या मध्ये सरकारी बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण करण्यात आली असा आरोप आहे. ह्या वेळी सुद्धा सरकार त्या बदल्यांमध्ये झालेल्या अफरातफरी आणि भ्रष्टाचारावर आक्षेप घेत गुन्हेगारांना शिक्षा करतील हे अपेक्षित होते. मात्र ह्या सरकारने चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणजे रश्मी शुक्लांवर कारवाई करुन, गुन्हेगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले असे चित्र जनतेसमोर उभे राहिले.
आता परत १२५ तासांची चलचित्रफित दिल्यानंतर तरी मविआ सरकारने गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ठोस पावले उचलायची सोडून दिली आणि देवेंद्र फडणवीस यांची चौकशी आरंभिली की जेणेकरून देवेंद्र फडणवीस यांना अधिकार आहेत का? यांचा माहिती जमा करण्याचा सोअर्स कुठला? काही सरकारी अधिकाऱ्यांचा सोअर्स मिळतो का? जेणेकरून त्यांच्या कडून काही माहिती मिळू शकते का? असला प्रकार आढळला.
आता काल समयाधीशांचे वक्तव्य आले त्याचा रोख असा की केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. त्यांचा रोख ईडी, सीबीआय तत्सम यंत्रणांवर होता. समयाधीश महाराज – न्यायालयाचे आसमान तुम्हाला खुले आहे. पण जितक्या केसेस ईडी, सीबीआय करीत आहेत त्यामध्ये प्रत्येक केस मध्ये आरोपीच्या घरातून घबाड हाती लागतंय. शिवसेना, अनिल देशमुख, हे तर भ्रष्टाचारी गुन्हे. पण नवाब मलिकांचा दाउद शी संबंध! तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यावर कारवाई करावीशी वाटली नाही. असे असेल तर ही विचारसरणी “राष्ट्रद्रोही” ह्या तालिकेमध्ये बसते. आता नेताच् राष्ट्रद्रोही तालिकेत असेल तर तर……..
काही दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे वक्तव्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे. त्यांनी म्हटले की राजकारणी भ्रष्टाचार करतात. जनतेच्या वाट्याला येणारे अरबो खरबो रुपये खातात, भ्रष्टाचार करतात. आणि मग तपासयंत्रणा आपले काम करीत असतील तर त्यामध्ये ती तहकिकात पुर्ण होवू नये, भ्रष्टाचार उघड होवू नये ह्याकरता त्यामध्ये व्यत्यय निर्माण करतात.
सबळ पुरावे असताना न्यायालय सर्वांसाठी खुले असताना मविआ विरुद्ध आलेल्या सर्व केसेस मध्ये सर्व पुरावे सबळ होते तर… मविआ सरकारने विरोधी पक्षांवर केलेल्या सर्व कारवायांना कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामध्ये मग अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, येतात. तर किरीट सोमय्या ह्यांनी उघड केलेल्या भ्रष्टाचाऱ्याच्या केसेस मध्ये मविआ सरकार एकदा ही गजाआड करु शकली नाही. हे मविआ सरकारचे फार मोठे अपयश आहे.
फक्त विरोधी पक्षांवर चिखलफेक करायची आणि सकाळी सकाळी फालतू मुद्द्यांचे राजकारण करायचे ह्याला जनता कंटाळली आहे. वाईनरी मध्ये आपल्या दोन्ही मुलींचे नाव आल्यावर अहंकारी राऊतांचा अहंकार दुखावला आहे. सरकार आपले असले की अहंकार, सत्तेचा माज हा आपोआप येतो. त्यासाठी परिपक्व नेतृत्व असेल तर जनतेसाठी कामं कशी केली जातात हे भाजपा सरकारने दाखवून दिले आहे. जो माईक सकाळी सकाळी तुम्ही घेऊन मिडीयासमोर कोकलता – तो माईक एकदा पारदर्शी रित्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडी द्या. म्हणजे तुमच्याबद्दल काय मुक्ताफळं जनतेच्या मनात आहे, तुम्हाला कळतील राऊत साहेब. सत्तेत आलात – सेवेकरी झालात. पण तुम्ही, तुमचे सरकार मात्र,”सत्तेत आलात – मेवेकरी झालात”. प्रत्येक घटना दाखवीत आहे की तुमच्या मविआ सरकार येण्याने महाराष्ट्राचे किती नुकसान झाले आहे. शेतकरी ते शैक्षणिक सर्व क्षेत्रात ऍपटलेली मविआ सरकार. आता मुख्यमंत्र्यांच्या साळ्याच्या घरात ईडी ने धाड घातली आणि मविआ सरकारला परत धडकी भरली. वाचकहो! मी प्रत्येक लेखात आवर्जून लिहीतो की मी मोदींचा फॅन एवढ्यासाठी की सत्तेतील वीस वर्षे आणि भ्रष्टाचाराचा एक डाग नाही. राहुल बेटा थकुन गेला,”चौकीदार चोर है!” म्हणत. त्याला लोकांनी पण चोख उत्तर दिले,”राहुल बाबा – चोराच्या उलट्या बोंबा” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संविधानाची बुज राखणारा पंतप्रधान. हिंदू धर्माची कास धरून जगाला मार्गदर्शक पंतप्रधान. “न खाउंगा – न खानेदुंगा” ह्या ब्रीद वाक्याचे तंतोतंत पालन करणारा पंतप्रधान.
अशावेळी जेव्हा भ्रष्टाचाराची धग महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्या घरात पोचली असताना – नवाब मलिक ह्यांचा राजीनामा घेण्याचा दबाव न झेलु शकणाऱ्या मविआ सरकारच्या नेत्यांच्या तोंडी ,”केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहेत” हे वक्तव्य सांगते आहे की ही महाराष्ट्रात तरी चमकणाऱ्या राजकारण्यांची घसरती अस्मिता राज्य करीत आहे. सामान्य जन हो सावधान! हिंदू म्हणून जर तुमची पुढची पिढी जगवायची असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. देश भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. विश्वासघाताची पन्नास वर्षे आज महाराष्ट्राच्या मतदारांना सांगताहेत की केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. ह्याचा अर्थ सामान्य जनांना सहज कळतो साहेब. तुम्हीच आपली उचलली जीभ लावली टाळुला आणि सामान्य जनांसमोर आपली खंत उघडी केली आणि मविआ सरकार भ्रष्टाचारात गुंतल्याचे प्रमाण दिले. सध्या तरी मुख्यमंत्र्यांचे घरापर्यंत ईडी पोचल्याने मविआ सरकारची बोबडी वळली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

भाई देवघरे

Leave a Reply