भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही तर ते काय भीक मागत आहे का? – संजय राऊत यांचा सवाल

नागपूर : २३ मार्च – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांमध्ये ईडीचा ससेमिरा कायम आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यापर्यंत ईडी पोहोचली आहे. ‘भाजपचे लोक काय भीक मागत आहे, ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले, फक्त आमच्याकडे पैसे आहे का? भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही तर ते काय भीक मागत आहे का? असा संताप सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवसंपर्क अभियानासाठी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. आज पत्रकारांशी बोलत असताना ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
‘भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले, ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहे का? ज्या पद्धतीने सिरीयल किलर असतात, रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच हे सीरियल कम्प्लेंट झालेले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
‘नागपूरत आहे, इथले उड्डाण पूल, रेल्वे पूल मेट्रोचे पूल रेल्वे एअरपोर्ट दिसत आहे. भाजपचे लोक काय भीक मागत आहे का? ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले म्हणजे, आमच्याकडे पैसे आहे, भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही तर ते काय भीक मागत आहे का? केंद्रीय तपास यंत्रणा हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल, असंही राऊत म्हणाले.
‘काही लोकांना दिलासा दिला जातो मात्र आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही. मी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि किरीट सोमय्यांच्या आरोपांबाबत पुरावे दिले आहे. पण आमच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही, असाही गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो. परमवीर सिंग यांच्यासारख्या 25 लोकांना दिलासा मिळाला. मात्र महाविकास आघाडीच्या कुठलाही नेत्यांना दिलासा मिळत नाही. जितेंद्र नवलानी यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर पद्धतीने होईल, असंही राऊत म्हणाले.

Leave a Reply