नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ

मुंबई : २१ मार्च – मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची णि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता आधी 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि 21 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपत आल्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.
कोर्टाने मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला. मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, पाठीचा त्रास होत असल्यामुळे बेड, खुर्ची णि चटई वापरण्यास मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. नवाब मलिक उपलब्ध नसल्यानं 2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहे. नरेंद्र राणे आणि राखी जाधव ह नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहे. नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्यानं त्यांची जबाबदारी तात्पुरती दिली जाणार आहे. त्यांच्या खात्यांची जबाबदारी आणि पालकमंत्रिपद, पदभार इतर मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतलाा आहे. ही नावं मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर जाहीर करू, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Leave a Reply