मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

आपलं स्वतःचं मन

तुम्ही स्वतःची कधी संवाद केला आहे का? तुम्ही स्वतःलाच कधी Invite केलं आहे का? तुम्ही निवांत वेळ स्वतःला कधी भेट दिली आहे का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे? स्वतःला कधी भेट भेटता येईल येते का? अहो खरच सांगते, मी आता ह्या लेखात आपण स्वतःची भेट करून घेऊ.
आपला जन्म होतो तेव्हापासून आपण स्वतःच्या सानिध्यात वास्तव करत असतो. इतर कोणत्याही व्यक्ती पेक्षा आपण स्वतःला जास्त ओळखतो. पण ती ओळख आतली की बाहेरची हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. व.पु.यांचे म्हणणे की ” ओळखपत्रासाठी विनोदी दुसरे काही नाही आपण कसे आहोत हे दाखवण्या पेक्षा आपण कसे दिसतो हे ओळखपत्र दाखवत” किती वास्तववादी वाक्य आहे.
यावरून तुम्ही विचार करा, खरंच हे सगळं आपल्या बाबतीत तर घडत नाही ना? असं तुम्ही एकदा स्वतःला विचारून बघा, मग तुम्हाला कळेल तुम्ही स्वतःला किती ओळखता.
जेव्हा व्यक्तीला कळतं की माझ्या अंगी असण्याऱ्या गुणाला मी कितपत ओळखतो. हे गुण सकारात्मक आहे की नकारात्मक हे तुम्हाला ओळखतात यायला हवे. एक उदाहरण देते, आपण समोरच्याची एखादी मदत करतो आपल्या मनाला समाधान मिळतं. पण यामध्ये अपेक्षा न ठेवता मदत करणे ही खरी मदत होईल, आणि जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची मदत लागेल आणि ती तुम्हाला काही कारणास्तव करू शकली नाही, तर लगेच तुमच्या मनात येईल मी तर हिच्या कामात आली आणि आता माझी वेळ आली तर ही काढता पाय घेते हे तुमच्या मनात आलं, तिथेच सगळं संपलं, कारण तुम्ही अपेक्षा भावनेने तिची मदत केली तुम्ही नि:स्वार्थ मनाने तिची मदत नाही केली.
आपण या जगात कशासाठी जन्म घेतला तुम्हाला उत्तर शोधायचे झाल्यास तर तुमचे स्वतःची असलेले जे नाते आहे ते मदतीला धावून येईल.
आपल्यातील जे अवगुण आहे त्या अवगुणानी तुमच्या मनाला घेरल आहे. भिती, व्यसन, वाईट सवयी,अहंकार, तिरस्कार या ज्या सवयी आहे या दुबळ्या आहेत. या सवयी तुमच्या मनाला पोखरून टाकण्याचा काम करतात. तुमच्या आयुष्यातील चांगल्या क्षणांना धोका निर्माण करू शकतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास, आपण आपली क्षमता ओळखण्यात कुठेतरी कमी पडतो आणि सकारात्मक गोष्टींचा पूर्णपणे वापर करत नाही.
आपल्या दैनंदिन जीवनातील उद घेऊ, उद्या जर तुमच्या घरचा कोणी आजारी असेल तर तुम्ही रात्रंदिवस तहान-भूक विसरून त्याची सेवा कराल. दुसरे उदाहरण एखाद्या घरी लग्न आहे त्या लग्नसमारंभात रात्रंदिवस मेहनत करून ते कार्य सफल कराल. या दोन्ही उदाहरणात आपल्या मनाच्या क्षमतेनुसार आपण त्या कार्यात कामी येतो आणि त्या वेळी स्वतः कडे लक्ष न देता ते कार्य सिद्धीस आणतो.
आपल्या गुणांची ओळख जर तुम्हाला झाली की त्याचा खूप फायदा होतो. जसे तुमच्या मनात सकारात्मक भावना वास करते, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा जगण्याचा अर्थ कळतो, तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळते, तुमचा ताण कमी होतो, आणि मुख्य म्हणजे कामात गोडी निर्माण होते.
हे सगळे होईल जेव्हा तुम्ही स्वतःच्या गुणांकडे सकारात्मक दृष्टीने बघाल तेव्हा तुमचे विचार, तुमचे वर्तन, व तुमच्या भावना या तुम्ही पडताळून पहाल.
अरे हे तर खूप सोपे आहे, मला नक्की जमेल, हा विचार डोक्यात आणला तर तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल.
कोणतेही काम उत्तेजित होऊन करणे, समजा एखादी आवडती गोष्ट तुम्ही उत्साहाने कराल, आत्मविश्वासाने कराल, एकाग्र होऊन कराल, ही तुमची भावनाच तुमच्या आयुष्याला गती देईल.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या थोर व्यक्ती यांचे सकारात्मक विचार आपल्या झोळीत टाका त्याचे विचार तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देऊ जातात.
आपण परमेश्वराजवळ रोज उठल्यावर एक प्रार्थना करावी, “हे देवा, माझ्या ओंजळीत जेवढे मावेल तेवढे मला दे”आणि रात्री झोपायच्या वेळी फक्त एक विचार आणा,” दिवसभरात आपण कोणाचे मन तर दुखावले नाही ना” आणि मनोमन त्यांची माफी मागा, मग बघा,तुम्हाला किती शांत झोप लागते ते.

पल्लवी उधोजी

Leave a Reply