पत्नी घर सोडून गेल्याने नैराश्यात असलेल्या पतीने विष घेऊन केली आत्महत्या

नागपूर : १६ मार्च – कुटुंब म्हटलं तर वाद होतच असतात. अशाच प्रकारचा वाद हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. नीलेश ठाकूर यांचे पत्नीशी भांडण झाले. नेहमीच दोघांचे खटके उडत होते. त्यामुळं पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती घराबाहेर निघून गेली. त्यामुळं नीलेशला अतिशय वाईट वाटले. तो चिंता करू लागला. आता घर पत्नीअभावी त्याचं मन रमेना त्यामुळं तो निराशेत होता. अशात त्याच्या मनात आत्महत्येचा विचार डोकाऊ लागला. त्याने विषाची व्यवस्था केली. ते विष घेतले. विषबाधा झाल्याने नीलेशचा मृत्यू झाला.
मृतक नीलेशचा पत्नीशी वाद झाला. या वादात दोघेही चांगलेच भांडले. नेहमीच्या या भांडणामुळं त्याची पत्नीही त्रस्त झाली होती. ती आधी त्याला सोडून जाण्याची धमकी द्यायची. या भांडणानंतर खरोखरचं ती नीलेशला सोडून गेली. या घटनेमुळं नीलेशला अतिशय दुःख झाले. त्यामुळं त्याने जीवनाचा शेवट करायचा कठोर निर्णय घेतला. विष कुठूनतरी आणले. मन कठोर करून ते घेतली. हळूहळू विष त्याच्या शरीरात भिनले. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply