उत्तरप्रदेशमध्ये बसपा, एमआयएम आणि कॉंग्रेस यांच्यामुळे भाजपला फायदा – प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : १५ मार्च – उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २७३ जागांवर विजय मिळवत पुन्हा एक हाती सत्ता मिळवली आहे. तर उत्तरप्रदेशमधील भाजपच्या विजयाची अनेक कारणं सांगितले जात असून राजकीय अभ्यासकांनी सुद्धा यावर वेगवेगळे मत मांडले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा भाजपच्या विजयाची कारणे सांगितले आहे. बसपा, एमआयएम आणि कॉंग्रेस यांच्यामुळे भाजपला फायदा झाला असल्याचं आंबेडकर म्हणाले आहे.
औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, सपाच्या ८० जागा एक हजार मतांनी पडल्या. माझ्या मते हिजाब हा मुद्दा तिथे महत्वाचा ठरलाच नाही. जिथे मुद्दा महत्वाचा ठरला तिथे मायावती, एमआयएम आणि काँग्रेसमुळे भाजपचं फावल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहूजन आघाडीची सोमवारी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून पोलिसांवर निशाणा साधला. सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं पोलिसांचे म्हणणं असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, ‘आता पोलीस कायदा व सुव्यवस्था कधी नाही म्हणत, मांजर मेली तरीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असे म्हणतात, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

Leave a Reply