सुट्टीवर घरी असलेल्या सीआरपीएफ जवानावर दहशतवाद्यांचा गोळीबार

श्रीनगर : १३ मार्च – जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती गेल्या काही काळामध्ये सुधारल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शनिवारी संध्याकाळी घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमधील शांततेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. शोपियनमधील छोटीपोरा गावात सुट्टीवर आपल्या घरी असलेल्या एका सीआरपीएफच्या जवानावर दहशतवाद्यांनी गोळीबार गेला. या हल्ल्यामध्ये जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जवानाचं नाव मुख्तार अहमद दोही असं होतं. ते शोपियानमध्ये आपल्या घरी सुट्टीवर गेले होते. मात्र, काही दहशतवाद्यांनी शनिवारी त्यांच्या घरी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये मुख्तार दोही हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला
दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा पथकाने मुख्तार दोही यांच्या घराच्या आसपासचा परिसर बंद केला असून सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे

Leave a Reply