सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

ग्रंथालय हे देवालय

घनदाट जंगलामध्ये लपलेली अजिंठा – एलोरा लेणी सापडली आणि सारे जग थक्क झाले. इ.स.१९८३ साली UNESCO ने World Heritage घोषित केली. २०१३ साली महाराष्ट्राच्या सात आश्चर्याची घोषणा केली त्यात प्रामुख्याने,”अजिंठा लेणी” लक्ष वेधून घेते. अजिंठा लेण्यात गौतम बुद्धाच्या विविध मुद्रा हे एक विशेषण.
अजिंठा वेरूळ लेणी ह्या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी सलग कातळात वरून खाली कोरल्या गेली. सगळ्यात पहिले म्हणजे जे काही बांधकाम किंवा कोरीव कामं केली जातात ती खालुन वर जातात. पण ह्या लेण्यांची कमाल ही त्यावेळच्या अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ ह्यांच्या शिक्षणाला द्यावी लागेल. काय शिक्षण असेल त्यावेळी! एक तर सलग “कातळ – खडक” आहे हे वरुन कसे कळले असेल? मग खडक फोडणे, कोरणे त्याचे रेखांकन. वापरलेले चित्राचे रंग आज ही रंग दाखवतात! कसे बनवले असतील असे रंग? आम्ही आज घरी रंग लावतो आणि बायको चार वर्षात कटकट करायला लागते की ह्या दिवाळी मध्ये परत घराला रंग लावा! आणि आम्ही आम्हाला प्रगत शास्त्राचे धनी समजतो.
ह्या लेण्याच्या शिक्षक – शिष्यांच्या वर्गाच्या खोलीचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकाला बसायला एक लांब आयताकृती खडकावर शांत बसा. गुहायुक्त आत असणारा वर्ग चांगला भला मोठा आहे. पण गंमत अशी की ह्या आयताकृती खडकावर बसुन तुम्ही कितीही हळू आवाजात बोला. ते हळू आवाजातील बोलणे अगदी शेवटच्या कोपऱ्यावरच्या – टोकावर बसलेल्या विद्यार्थ्यांना ऐकु येते. तुम्ही जोरात श्वास घेतला तर तो हवेचा आवाज संपूर्ण कोपऱ्याकोपऱ्यात ऐकु येतो. काहीही यंत्र न वापरता नैसर्गिक रित्या ऐकु येतो! काय असेल हो हे शास्त्र?
खडक किंवा सलग कातळामध्ये आमच्या आजच्या अतिप्रगत खदानी बघा. स्फोटके लावून उडवतात आणि मग क्रशरवर त्याचे हवे त्या आकाराचे तुकडे पाडतात. संगमरवर च्या खाणीतून सलग मोठे मोठे क्युब काढतात आणि मग त्याचे कारखान्यात स्लाईसेस कापतात. विकायला नेतात. पण काळ्या कातळात एवढ्या भव्य प्रमाणावर लेणी किंवा कोरीव काम ते ही बारीक बारीक आकर्षक, की बघायला डोळे मोठ्ठाले करुन बघावे आणि आश्चर्यकारक कार्यकुशलतेसाठी तोंडात बोटे घालावी. गंमत म्हणजे १००० वर्षाच्या वर झाले अजुन लेणी बघायला अलट गर्दी. कुठे पडझड नाही की इतक्या वर्षात कुठे पडझड नाही.
कुठे गेले ते विज्ञान? आज आम्ही का करु शकत नाही? कुछ तो गडबड है दया!
विष्णू स्तंभाजवळ (कुतुबमिनार आजचा) असलेला लोहस्तंभ – आमच्या पुरातन विज्ञानाचे एक अद्वितीय उदाहरण. हा “लोहस्तंभ” असे म्हणतात की हा लोहस्तंभ राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य ( राज ३७५-४१३) ने केला असावा असे म्हणतात. काही इतिहाहकारांचे म्हणणे आहे की हा लोहस्तंभ कदाचित त्या अगोदरचा असावा. ह्या मध्ये ९८% अंश लोखंडाचा आहे आणि गंमत म्हणजे आजतागायत गंजला नाही. ह्या “लोहस्तंभाला” आपण आज आपल्या विज्ञानाची सांगड घालून बनवू शकतो! की जो लोहस्तंभ पिढ्यादरपिढ्या गंजणार नाही! काय म्हणता! नाही? का?
आमचेच पुरातन विज्ञान पण आज आमच्या कामी येणारे नाही! कुछ तो गडबड है दया!
ज्या विमानांचे वर्णन रामायण मध्ये आहे. ज्यावर उभे राहु शकतो आणि युद्ध पण करु शकतो. अशा प्रकारचे ५००० वर्ष जुने विमान, त्याचे वर्णन “Flying Object” असे वर्णन अमेरिकन सैनिकाना अफगाणिस्तान च्या एका गुहेत सापडले. गंमत म्हणजे शास्त्रज्ञांच्या मते हे विमान चालु अवस्थेत आहे पण कोणाला सापडत नाही की हे विमान सुरू कसे करायचे? आज आहे आमच्यापाशी अशा प्रकारचे विमान? ज्यावर आपण उभे राहून युद्धवत स्थितीत योद्ध्याला उभे करुन युद्ध करण्यास सक्षम असेल! नाही आजपण नाही करु शकलो! का?
कुछ तो गडबड है दया!
भारताला पुर्वी “सोने की चिडिया” म्हणायचे. सर्व मंदिरात विपुल सोन्याने मढविलेली, राजा महाराजा राण्या महाराण्या यांचे घराण्यात विपुल सोन्याचा वापर होत असे. कुठुन आणत असे एवढे सोने? असे म्हणतात की सोन्याच्या खाणी व्यतिरिक्त गोमुत्रातून सोने बनविण्याची कला त्यावेळी अवगत होती. वाचकहो! आता समजेल आपले ऋषीजन आपल्याला गोमुत्र प्यायला का सांगायचे? शरीराला त्यायोगे सोन्याची मात्रा मिळत असे. आज आयुर्वेदातील औषधांच्या किमती बघा की ज्यात सोने आहे असे “सुवर्णभस्म” वगैरे वगैरे.. जे ऋषी मुनी आपल्याला फुकट देत होते आणि आम्ही आज हजारो रुपये देऊन औषधाच्या नावाने घेत आहोत. आजसुद्धा गुजरात मध्ये डॉक्टर ढोलकिया ह्यांचे ह्या विषयावर संशोधन सुरू आहे. त्यांच्यामते “गिर” गायीच्या १लिटर मुत्रामध्ये ३-१० मिलीग्राम सोने विरघळलेल्या अवस्थेत असते. आणि त्यांच्यामते हे सोने रासायनिक प्रक्रियेद्वारे शुद्ध स्वरूपात आणले जाऊ शकते. पण हा शोध आज ही प्रायोगिक तत्वापर्यंत मर्यादित आहे. जे आम्हाला हजारो वर्षाअगोदर गाईचे महत्व सांगितले गेले त्यामागचे व्यवहारीक फायदेशीर कारण हे सुद्धा आहे. इतके प्रगत आमचे पुरातन विज्ञान.
आम्ही वरच्या दोन चार उदाहरणापुरते मर्यादित होतो का? नाही प्रत्येक क्षेत्रात अमर्याद होतो. प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाने परिपूर्ण होतो. आमचे पुरातन विज्ञान जनमानसाला सुलभ जीवन जगण्यास सहाय्यक होते. आमचे आयुर्वेद सर्वसंपन्न होते. पुरातन दाखले सांगतात की प्लास्टिक सर्जरी, ऑपरेशन हे सर्व त्यावेळी होत असे. युद्धात जखमी सैनिक तत्काळ बरे करण्याची किमया त्यात होती. आमचे आयुर्वेद शास्त्र सामान्य माणसाला स्वस्त, रामबाण उपायांचे शास्त्र होते. रोगाच्या मुळावर घणाघात करणारे “नाडी शास्त्र” होते. नुसत्या नाडी परिक्षेवरून रोगाला समुळ उच्चाटन करण्याची औषधीय योजने ची किमया होती. असे किती किती पुरातन विज्ञान मनुष्याला जगण्यास “भगवंताचे” अधिष्ठान असणाऱ्या देवालया सारखे होते. पण आज आम्ही हे सर्व विसरलो. आज कोरोना काळात डॉक्टर लोकांनी लोकांच्या जीवाला आणि त्यांच्या पैशाला सळोकीपळो केले. कुठे चाललो आम्ही आमची नैतिक जबाबदारी हे सर्व त्यावेळी लहानपणापासून “नैतिकता” आमच्या संयुक्त कुटुंबाच्या संस्कृती चा एक हिस्सा होता.
आमचे पुरातन “नालंदा विद्यापीठ” गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त (इ.स.३७०-४५५)चे दरम्यान ह्या विश्वविद्यालयाची स्थापना केली. सम्राट हर्षाच्या काळात ह्या विद्यापीठाची भरभराट झाली. “नलविहार” नालंदा विद्यापीठाचे सर्वात पहिले नाव.
नालंदा विद्यापीठ त्याकाळचे सर्वात अद्ययावत विद्यापीठ. तीनशे खोल्यांचे वसतीगृहे, ८० सभागृहे, अध्यापन कक्ष १०० च्या आसपास. जवळ जवळ दहा हजार विद्यार्थी असणारे नालंदा विद्यापीठ. तीन हजार विद्यार्थी वसतिगृहात राहणारे. चीन, तिबेट, कोरिया येथून अभ्यासासाठी येणारे. शरीर विज्ञानापासून ते धातु विज्ञानासारखे सर्व विषय येथे शिकविले जात होते. अध्यात्मापासून ते ज्योतिष शास्त्राचे खरे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविण्याचे नालंदा विद्यापीठ हे एक “विश्वगुरू” असणारे विद्यापीठ होते.
असे म्हणतात की नालंदा विद्यापीठाचे “ग्रंथालय – धर्ममायायोग” नावाने प्रसिद्ध आणि अनेक मजल्यांवर विखुरले होते. हजारो हस्तलिखिते होती. तीन उपविभागात विभागलेल्या ग्रंथालयाची उपनावे रत्नोदधी, रत्नसागर, रत्नरंजक. ह्या ग्रंथालयातील पुस्तकांचा अभ्यास करून त्यावेळी सामान्य जनांचे जगणे सुसह्य होत असे. विज्ञानात झेप घेत असे. त्यायोगे मनुष्य जीवनाला ही ग्रंथालये देवालयासमान. ह्यांच्या अभ्यासाने जनांचे कल्याण आणि उपजिविकेचे साधन हा सुवर्ण मध्य साधला जात असे. मात्र ह्या देवालयाला दृष्ट लागली.
इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी ने नालंदा विद्यापीठावर आक्रमण केले. येथील ज्ञानयोगी देवालय रुपी ग्रंथालयाला आग लावली. नालंदा नगरावर आक्रमण केले. असे म्हणतात येथील ग्रंथालय कित्येक महिने जळत होते आणि आमचे पुरातन विज्ञान त्यात जळून खाक झाले. आमच्या पुरातन शास्त्रीय अभ्यास लिखीत स्वरुपात असणाऱ्या देवालय रुपी ग्रंथालयाचा लय झाला आणि आज आम्ही आमच्या पुरातन शास्त्रोक्त सामान्य जनसहायक विज्ञानाला लोप पावलो.

भाई देवघरे

Leave a Reply