आ. बच्चू कडू यांना मातृशोक

अकोला : १३ मार्च – अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांचे काल सकाळी दहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. इंदिराबाई या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील राहत्या घरी इंदिराबाईंनी अखेरचा श्वास घेतला. दुखःद बातमी मिळताच बच्चू कडू अमरावतीवरून गावाला गेले. बच्चू कडू यांनी ही दुखत बातमी आपल्या ट्विट अकाउंटवरून शेअर केली. सोबत आईसोबतचा फोटोही टाकला.
माझ्या आयुष्याला वळण देणारी माझी आई मला सोडून गेल्याचं बच्चू कडू यांनी ट्विटवर सांगितलं. दुपारी पावणेदोन वाजता त्यांनी हे ट्विट केलंय. त्यानंतर बेलोरा येथील राहत्या घरी सकाळी दहा वाजता इंदिराबाई यांचे निधन झाले.
खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबूकवर या निधनावर दुःख व्यक्त केले. ते म्हणतात, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई बाबाराव कडू यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना! कडू परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे.

Leave a Reply