लोकवस्तीत असलेल्या भंगाराच्या गोदामाला लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही

अमरावती : १० मार्च – अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार ते परतवाडा मार्गावर असलेल्या फ्रेंच कॉलनीमधील लोकवस्तीत आग लागली. यात एका मोठ्या भंगारच्या गोडाऊनचे नुकसान झाले. भर लोकवस्तीमधील गोडाऊनला आग लागली. त्यामुळं भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची घटना समोर येताच चांदुरबाजार नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली आहे. या आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.
चांदुरबाजारच्या फ्रेंच कॉलनीत भंगाराची दुकान आहे. ही दुकान भर वस्तीत आहे. या ठिकाणी खरेदी करून आणलेले भंगार ठेवले जाते. आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. पण, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते.
भंगाराचे साहित्य असल्याने ही आग जोराने पसरली. त्यामुळं सर्व भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. आगीनंतर धुळाचे लोट आकाशात वाहताना दिसत होते. ही आग पाहण्यासाठी लोकांनी बरीच गर्दी केली होती. पण, आग मोठी असल्यानं त्वरित विझविता आली नाही. त्यामुळं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत भंगाराचे साहित्य जळून खाक झाले होते.

Leave a Reply