मनाच्या हिंदोळ्यावर

मनाचा वेग

आजकाल आपण बघतो, सिनेमात नायक लोकांच्या तोंडी आपण एकतो, ” मुझे बहोत आगे जना है क्यो की, मुझे रप्तार पसंद है” पण येथे ह्याचा अर्थ स्पीड, किंवा गाडी चालवण्याचा नाही तर आयुष्यात पुढे जाण्याचा, आयुष्य जगण्याचा वेग. पण आजकाल आयुष्य जगण्याचा वेग हा फार कमी होतांना दिसून येतो .
आज प्रत्येक जण सुखं उपभोगण्यासाठी एकमेकाशी स्पर्धा करतांना दिसत आहे. अरे, स्पर्धा ही फक्त स्वतःशीच करा, ते मात्र आपण विसरतो अस वाटत. प्रत्येक गोष्टीला एक वेळ येऊ द्यावी लागते. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला सगळ पटकन मिळत नसतं. ते त्या योग्य वेळी मिळत असतं. माणसानी आशावादी असावं निराशावादी नसावं.
आधीच काळ आता नाही राहिला. काळाबरोबर आपले राहणीमान,बापल्या जगण्याची शैली ही बदलत चाललेली आहे. माझ्या मते व्यक्तीने काळानुरूप बदलायला हवे. काळानुसार त्या त्या पद्धती अंगीकारायाला हव्या. आपणच आपल्या आयुष्यावर control करू शकतो. पण होत काय आपण इतर लोकांच्या बाबतीत त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतो. ह्यात कसला आलाय शहाणपणा.
आयुष्यात माणूस हा नाव, पैसा, प्रसिद्धी, बढती, लग्न, मुल, व्हेकेशन,भड्या, कपडे, घर ह्यामागे वेगात धावताना दिसतो. पण हे सगळं मिळवण्याच्या नादात ब्रेक कसा घ्यायचा, वेग कुठे कमी जास्त करायचा हे मात्र विसरत चाललाय.
आता हेच बघा, आपण जगण्याच्या नादात, आपल्याला हा केवढा मोठा ब्रेक मिळाला. आता तरी ह्या वेगाच्या बाबतीत आपल्याला सावध व्हायला हवं. ह्या दीड दोन वर्षात नियतीने आपला जगण्याचा वेग कमी केला आणि मृत्युने आपला वेग मात्र अचानकपणे वाढवला. आतातरी ह्यातून काहीतरी शिकण्याचा चंग बांधायला हवा.
ह्या सगळ्यात काय झालं माहिती का, माणसाची बुद्धिमत्ता, आणि पण सर्व शक्तिमान आहोत हा अहंकार आज कुठेतरी आडवा येत आहे. अस मला वाटत. मनात येतंय काहीतरी चुकीचे घडते आहे. असो
आयुष्य जगण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी वायुवेगाने मिळवायच्या आहेत. पण मृत्यूचे पाश माणसाला आवळत आहे. ते मात्र वायुवेगाने नको. अरे, मृत्यू हा अटळ असतो. जो जन्मला त्याला मृत्यू हा येणारच
आयुष्य जगताना वेग कुठे वाढवायचा, कुठे स्थिर ठेवायचा, कुठल्या वळणावर थांबायचं हे आपल्या हाती असायला हवं. जसं गाडी चालवताना कुठे स्पीड घ्यायची व कुठे ब्रेक मारायचा हे कसं आपण ठरवतो त्याचप्रमाणे आयुष्याची गाडी चालवताना कुठे ब्रेक मारायचा,बकुठे थांबायचं हे ठरवता यायला हवं.
माझ्या मते आयुष्याचा वेग हा काही वाईट नाही. पण वेगात असताना सावध होता आलं पाहिजे. हे करतांना आपलं आयुष्य जसं सावधपणे जगू तसेच इतरांच्या आयुष्याला आपल्यामुळे त्रास होता कामा नये. ही सावधानता बाळगायला हवी. तरच अपल्यावयुष्याचे सार्थक होईल. चला तर मग, हावप्ल्या आयुष्याचा वेग वाढवताना आपण सावधगिरी बाळगू या.

पल्लवी उधोजी

Leave a Reply