वाशिममध्ये रस्त्याच्या कडेला सापडले मृत अर्भक

वाशिम : ८ मार्च – जागतिक महिलादिनाच्या पुर्वसंध्येला (सोमवारी रात्री) मंगरुळपीर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंदाजे चार ते पाच महिन्याचे अर्भक ग्राम पार्डी ताड येथे रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत फेकलेले आढळले आहे. डाॅक्टरचा चमु आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणी याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली आहे. सदर अर्भक हे पुरुष की स्ञी जातीचे हे पुढील फाॅरेन्सिक लॅबच्या अहवालावरुनच कळणार आहे.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला प्रा. आरोग्य केंद्र शेलुबाजार अंतर्गत उपकेंद्र पार्डी ताड येथे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अरविंद भगत यांना आरोग्य सेविका पार्डी ताड यांनी फोनवरून पाच वाजताच्या दरम्यान सांगितले, की पार्डी ताड येथे एक मृत अर्भक रस्त्याचे कडेला फेकून दिले आहे. डाॅ. भगत यांनी स्वतः संबंधित ठिकाणी सायंकाळी पाच वाजता भेट देऊन संबधित बाबतीत पोलिसांनाही माहिती करून दिली. पोलीस प्रशासनाच्या मदतीने मृत अर्भकास पुढील कार्यवाही करीता ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे पाठविले. डॉ. जाधव वैद्यकीय अधीक्षक यांचेशी याबाबत चर्चा केली असता संबधित मृत अर्भक हे चार ते पाच महिन्याचे असून आणि पुढील तपासणी करीता नागपूर फॉरेन्सिक लॅब येथे पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले.
मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम पार्डी ताड येथे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सभा घेणार आहेत. गावातील प्रत्येक नोंदणी केलेल्या गरोदर मातांची माहिती घेण्याबाबत सुचित केले. तसेच दोन दिवसात प्रसूती झालेल्या माताची माहिती घेणेबाबत आरोग्य विभागाकडुन सुचित केले. सदर चार ते पाच महिन्याचे मृतावस्थेतील अर्भक हे स्ञी जातीचे की पुरूष जातीचे हे फाॅरेन्सिक लॅबमधून आलेल्या अहवालावरुन कळणार आहे. पोलिसांनीही याप्रकरणी सखोल चौकशी सुरु केली आहे.

Leave a Reply