तामिळनाडूमध्ये दरोडा टाकणारे बिहारचे आरोपी चंद्रपूरमध्ये जेरबंद, सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर : ६ मार्च – तामिळनाडूमध्ये दरोडा टाकणाऱ्या बिहारच्या आरोपींना अटक करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ही अटक केली. तीन किलो सोने, 27 किलो चांदीसह सव्वादोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरजवळ ही कारवाई करण्यात आली. चार आरोपींना अटक केली असून हे चारही आरोपी बिहारचे आहेत. त्रिपुरा ते चेन्नईच्या दिशेने जाणारी गाडी क्र. 12578 बागमती एक्स्प्रेसमध्ये चार युवक सोने-चांदीचे दागिने नेत होते. दरोडा टाकून मुद्देमालासह बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे सुरक्षा बलाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. बल्लारशहा स्थानकावर गाडीची तपासणी करण्यात आली. दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये सोने-चांदीची दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळल्या. या दागिन्यांची किंमत दोन कोटी दहा लाख आहे. विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली असल्याची माहिती स्थानिक आरपीएफ विभागाच्या वतीने सांगण्यात आली आहेत.
रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या तपासणीत चोरट्यांकडून बॅग व गोणी जप्त करण्यात आली. नवीन व जुने कपडे, तीन काळ्या रंगाच्या पिशव्या व निळ्या रंगाची एक छोटी पिशवी, हिरव्या रंगाची मोठी पिशवी व निळ्या रंगाच्या गोणीमध्ये सापडले. यामध्ये सोने, चांदी आढळले. दोन्ही पिशव्यांमधील माल रिकामा करून गोणी, सोने, चांदी व पैसे वेगळे केले. त्या पिशवीत सापडलेले सोने, चांदी व पैसे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून त्यांचे वजन केले. यामध्ये ३ किलो ३0६ ग्रॅम सोने सापडले. याची किंमत अंदाजे 1 कोटी 76 लाख 57 हजार रुपये आहे. 27 किलो 972 ग्रॅम चांदी सारपडली. याची अंदाजे किंमत 1 कोटी 95 लाख 8 हजार रुपये आहे. याशिवाय 14 लाख 52 हजार रुपये रोख सापडली.
या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. बिहारमधील महताब आलम (वय 37) जहाँगीर खान (वय 20), अब्दुल वाहिब (वय 30), आरिफ (वय 20), अशी आरोपींची नावे आहेत. पंचनामानंतर मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहेत. ही कारवाई आरपीएफ निरीक्षक नवीन प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रवीण महाजन, उपनिरीक्षक प्रवीण गाडवे, सहायक उपनिरीक्षक डी. गौतम, उपनिरीक्षक राम लखन, प्र. कॉन्स्टेबल रामवीर सिंग, प्र. कॉन्स्टेबल डी. एच. डबल, प्र. कॉन्स्टेबल जितेंदर पाटील, हवालदार पवनकुमार, हवालदार शिवाजी कन्नोजिया, हवालदार देशराज मीना, आर. मोहम्मद अन्सारी, आर. हरेंद्र कुमार, आर. रूपेश यांच्या वतीने करण्यात आली आहेत.

Leave a Reply