ओंजळीत्तील फुलं 33 – महेश उपदेव

रोमहर्षक आटया पाटया

28 dec mahesh updeo final

देशात प्राचिन खेळ म्हणून आटया पाटया खेळाकडे बघितले जाते, ज्या राज्यात मराठी भाषिक लोक राहतात त्या प्रांतात मोठया प्रमाणात खेळल्या जात होता, सुरपाटी,दर्यावंद,सरागरी,तिल्ली,चौपालपाटी,पचवाटी, चिक्का, सरामणी, या नावाने आट्यापाटया खेळ ओळखला जातो,
1982 मध्ये हिंदुस्थानात आशियन गेम्स झाले, यावेळी, माजी खासदार एस डब्ल्यू धाबे यांनी आटयापाटया महासंघाची स्थापना केली, पहिली राष्ट्रीय स्पर्धा नागपुरात झाली,
महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सचिव स्व अरुण गडकरी यांनी आम्हाला या खेळाची माहिती दिली, 1982 मध्ये आम्ही एमकेएम मध्ये बास्केट बॉल, खो-खो, व आटया पाटया हे खेळ खेळायला लागलो, नागपूर शा शि महाविदयालय धंतोली येथे प्रा दिपक कवीश्वर यांच्या मार्गदर्शनात सराव सुरु केला, पहिली राष्ट्रीय स्पर्धा नागपुरात रंगली, त्याचे महाराष्ट्र संघा कडून मी प्रतिनिधीत्व केले, या खेळात आमचा रस वाढला, बास्केट बॉल बरोबर आम्ही आटयापाटया खेळू लागलो.
अभय कोळस्कर, शामराव कुबडे, दशरथ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या कॉग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश हायस्कूल च्या मैदानावर सराव सुरु केला, जोमात सराव सुरु असताना आम्हाला आटयापाटया चे धडे खोखो खेळाडूनी दिले,
देशात आटयापाटया च्या स्पर्धा कुठेही असल्यातरी आम्हाला आमंत्रन असायचे कारण महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार एस डब्ल्यू धाबे सर होते, पहिली ज्यूनीयर आटयापाटया स्पर्धा गुजरात मधील बडोदा येथे गुजरात आटयापाटया संघटनेने आयोजित केली होती, बडोदा येथे 11ते 14 फेब्रुवारी 1983 ला स्पर्धा होती, या करीता महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला, आमचा सहकारी प्रशांत रोहणेकर यांची कर्णधार पदी नियुक्ती झाली,माझ्या सह संजय जोग, निशीकांत वाघमारे, संजय चौधरी,विजय दातारकर, पदमाकर चारमोडे खेळाडूंची संघात वर्णी लागली, ही स्पर्धा बडोदा येथे महाराष्ट्र मंडळाच्या मैदानावर खेळविण्यात आली, गुजरात, मध्यप्रदेश,कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांनी स्पर्धत भाग घेतला, या खेळाची ज्युनियर गटाची पहिलीच राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा होती, या स्पधेत आम्ही उपांत्य फेरी पर्यत मजल मारली होती, त्यानंतर आम्ही मागे वळून बघितलेच नाही,त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय स्पधेत भरीव कामागिरी केली.
दुसऱ्या वर्षी कर्नाटक मधील हुबळी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धत अभय कोळस्कर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाचे आम्ही प्रतिनिधीत्व केले.
या स्पर्धा आम्ही कधीच विसरू शकत नाही

जय महाराष्ट्र

महेश उपदेव

Leave a Reply