चार्टर्ड अकाउंटंट व सेवा कर अधिकारी ४ लाखांची लाच घेताना अटकेत

नागपूर : ४ मार्च – नागपूरमधून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने आज नागपुरात एका चार्टर्ड अकाउंटंट आणि वस्तू व सेवा करच्या अधिकाऱ्याला तब्बल चार लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. शासनाच्या सेवेत कार्यरत असलेले अधिकारीच असं वागत असतील तर सर्वसामान्य माणसांनी नेमकं कुठे जावं? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. सीबीआयने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत कारवाई केल्याने तक्रारदाराने सूटकेचा श्वास सोडला आहे. सीबीआयकडून आरोपींच्या घरांची झडती सुरु आहे.
वस्तू व सेवा करच्या कामानिमित्त सहआयुक्तांच्या मनधरणीसाठी किंवा त्यांना प्रवृत्त करण्यासाठी एका चार्टड अकाउंटंटने तक्रारदाराकडे चार लाखांची लाच मागितली होती. यावेळी तक्रारदाराने सीएला समजविण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण तो एकूण घेण्याच्या मनस्थिततच नव्हता. विशेष म्हणजे संबंधित प्रकरणावरुन पोलीस आयुक्ताने कर दायित्वाशी संबंधित नोटीस तक्रारदाराला पाठवली. हे संपूर्ण प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपी चार्टड अकाउंटंट आणि सहआयुक्ताने साडेचार लाच मागितली, अशी माहिती तक्रारदाराने दिली. पैसे दिले नाही तर संबंधित मुद्दा मार्गी लावणार नाही, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला.
संबंधित प्रकरण जास्त महागात पडतंय, साडेचार लाख रुपये लाच देणं योग्य नसल्याचं तक्रारदाराला जाणवत होतं. त्यामुळे त्याने सीबीआयला रितसर तक्रार करत आपली व्यथा मांडली. सीबीआयने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. सीबीआयने आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी अनोखा सापळा रचला. त्यानंतर सीबीआयने आरोपींना लाचेची रक्कम मागताना आणि स्वीकारताना बेड्या ठोकल्या. सीबीआयची कारवाई अद्यापही सुरुच आहे. सीबीआय अधिकारी आता आरोपींच्या घराची झडती घेत आहेत.
विशेष म्हणजे जीएसटी फसवणुकीची आणखी एक बातमी आज समोर आली आहे. सर्वसामान्य माणसं प्रामाणिकपणे आपला टॅक्स भरतात. सर्वसामान्याला प्रत्येक वस्तूमधून जीएसटी भरावा लागतो. पण ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भामट्याने खोटे कागदपत्रे दाखवत शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे देशातील जीएसटी फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना असल्याचं बोललं जात आहे. संबंधित घटना ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातून समोर आली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. आरोपीने शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं आता उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीला कल्याण इथून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संबंधित 49 वर्षीय आरोपीचं अशोक राजभर असं नाव आहे. त्याने हार्डवेअरींग आणि नेटवर्किंगचा व्यापार असल्याचं दाखवलं होतं. त्याने शासनासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवला होता. त्यातून त्याने शासनाची 84 कोटी रुपयांची फसवणूक केली.

Leave a Reply