ओंजळीतील फुलं : 32 – महेश उपदेव

प्रा. बारसेंच्या जीवनावर चित्रपट झुंड, च्या निमीत्ताने अभिनंदनाचा वर्षाव

28 dec mahesh updeo final

फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरिब व झोपडपट्‌टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट आज राज्यात प्रदर्शित झाला आहे, प्रा विजय बारसे यांच्या वर आज सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“सैराट’फेम नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारली आहे.
हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. झोपडपट्‌टीतील गुंड प्रवृत्तीच्या अनेक युवकांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणून त्यांचे करिअर सावरले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. गोरगरिब खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरलेल्या प्रा. बारसे यांच्या कर्तृत्वाची दखल आता बॉलीवूडनेही घेतली आहे. “सैराट’ चित्रपटाने जगभर लोकप्रियता मिळविणारे प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, स्वत: “बिग बी नी’ प्रा. बारसे यांची भूमिका साकारली आहे.
सामना ‘ने यासंदर्भात प्रा. बारसे यांच्या भावना जाणून घेतल्या असता ते म्हणाले, माझ्या जीवनावर चित्रपट आला आहे याचा मला व्यक्‍तीश: आनंद आहे, पण कौतुक नाही. कारण मी नेहमीच “लो प्रोफाईल’ आयुष्य जगलो आहे. प्रसिद्धीची हाव कधीच केली नाही. मात्र, चित्रपटाच्या माध्यमातून माझे विचार आणि संदेश लोकांपर्यंत जात असेल तर, त्यात निश्‍चितच समाधान आहे. या चित्रपटाशी अमिताभ आणि नागराज मंजुळेसारख्या दोन मोठ्या व्यक्‍ती जुळणे, हा केवळ माझाच नव्हे, नागपूरकरांचा गौरव आहे. फिफा व रिअल हिरो या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह देशविदेशात अनेक मानसन्मान मिळविणारे प्रा. बारसे यांच्या कर्तृत्वाची दखल आमीर खाननेही घेतली होती. आमीरच्या गाजलेल्या “सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातील एका भागात प्रा. बारसे यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. शिवाय अंबानी परिवारानेही त्यांच्या कार्याची भरभरुन स्तुती केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नागपूरात झाले.

चित्रपटापेक्षा खेळाडू महत्वाचा

प्रा. बारसे सध्या चर्चेत असले तरी, त्यांच्यासाठी केवळ खेळ आणि खेळाडूच महत्त्वाचा आहे. बोखारा येथील क्रीडा विकास संस्थेच्या मैदानावर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू असून, त्यावरच सद्‌यास्थितीत आपला सर्व फोकस असल्याचे त्यांनी सांगितले. शहराबाहेरील मातीत प्रशिक्षणाचे धडे घेत असलेले भारतीय खेळाडू ओस्लो (नॉर्वे) येथे आयोजित जागतिक झोपडपट्‌टी स्पर्धेत भाग घेणार आहेत.

महेश उपदेव

Leave a Reply