युनियन बँक ऑफ इंडियाला कर्जधारकांनी लावला कोट्यवधींचा चुना

नागपूर : २ मार्च – नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत युनियन बँक ऑफ इंडियाला कर्जधारकांनी कोट्यवधींचा चुना लावला आहे.
कर्जाच्या आठ प्रकरणात काही कर्जधारकांची नावे ही सारखी आहे. आठही प्रकरणात त्यांच्या नावाचा कुठे ना कुठे उल्लेख आहे. या आरोपींनी विविध कारणांकरिता बँकेत कर्जासाठी अर्ज सादर केले. त्यानंतर बनावट कागदपत्रे सादर करीत कर्जमिळवले. परंतु, या कर्जाचा परतावा केली नाही. तक्रार दाखल असलेल्या आठ प्रकरणांच्या अनुषंगाने २0 जुलै २0१५ ते १९ फेब्रुवारी २0२२ या कालावधीत बँकेतून सदनिका खरेदीकरिता आरोपी मंगेश रंजित जगताप (रा. प्लॉट नंबर ५0७ रचना युतिका अपार्टमेंट काचीमेट अमरावती रोड), सुरेश काशीनाथ गोतमारे (रा. ब्लॉक सेक्टर ३९ प्लॉट नंबर १९९, लघुवेतन हाउसिंग सोसायटी, कामठी) यांनी कर्जासाठी अर्ज केला होता. त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करीत १ कोटी १९ लाख ८११ रुपयांचे कर्ज घेतले.
दुसऱ्या घटनेत १४ फेब्रुवारी २0१७ ते १९ फेब्रुवारी २0२२ या कालावधीत आरोपी नितेश नानाजी वारके (रा. प्लॉट नंबर १६, रामकृष्णनगर उमरेड रोड दिघोरी) यांनी सदनिका खरेदीकरिता कर्ज घेत २९ लाख १ हजार ३५४ रुपयांची परतफेड केली नाही. तिसऱ्या घटनेत १५ ऑक्टोबर २0२0 ते २८ फेब्रुवारी २0२२ या कालावधीत आरोपी मंगेश रंजित जगताप, अपर्णा गोपालकृष्ण कोमावार (रा. फ्लॅट नंबर ९, सर्वेनगर, जयताळा रोड), सैयद मुस्तफा (रा. ५0३ समृद्धी संकुल सिव्हिल लाईन) यांनी कर्ज घेत २२ लाख ५२ हजार रुपयांची परतफेड त्यांनी केली नाही. चवथ्या प्रकरणात आरोपी मंगेश रंजीत जगताप, राजकिशोर गुडेराव जगताप यांनी होंडा सिटी कार घेण्याकरिता ५ लाख ६ हजार ४७६ कर्ज घेतले. पाचव्या प्रकरणात, आरोपी मंगेश रंजित जगताप, अमीत चंद्रशेखर भागवत (रा. नागपूर) यांनी महिंद्रा बोलेरो वाहन गाडी खरेदीकरिता ७ लाख ४७ हजार ९६७ रुपयांचे कर्ज घेतले. सहाव्या प्रकरणात, सतीश प्रभाकर काळेश्वरराव (रा. प्लॉट नंबर ३९, सर्वश्रीनगर, दिघोरी), मंगेश रंजित जगताप यांनी शक्तिवर्धक व ग्लुकोज पावडर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मशिनरी व इतर अवजारे घेण्यासाठी ५२ लाख ६५ हजार ७८६ रुपयांचे कर्ज घेतले. सातव्या प्रकरणात आरोपी गणेश अंकुश लांजेवार (रा. फ्लॅट नंबर १0१, पहिला माळा, नेहा अपार्टमेंट) याने २६ लाख ३0 हजार 00६ रुपयांचे कर्ज घेतले. तर आठव्या प्रकरणात आरोपी अमोल रविकिरण कुंभारे, रविकिरण सदाशिव कुंभारे (दोन्ही रा. संजयनगर, प्लॉट नंबर ४१, हसनबाग) यांनी ९१ लाख २६ हजार ८८0 रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केली. या प्रकरणी युनियन बँक शाखेचे व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply