कौटुंबिक वादातून मुलाच्या मदतीने मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

नागपूर : २८ फेब्रुवारी – कौटुंबिक वादातून मुलाच्या मदतीने सावत्र भावाने काठी व दगडाने ठेचून लहान भावाची हत्या केली. सदर घटना रविवारी (२७ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास येथून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या भागेबोरी येथे घडली. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.
विजय भाऊराव डेकाटे (वय ३२, रा. भागेबोरी), असे मृतकाचे तर हंसराज भाऊराव डेकाटे (वय ५१) व प्रणय हंसराज डेकाटे (वय २५, रा. नागपूर) अशी आरोपी बाप-लेकाची नावे आहेत. मृत विजय व हंसराज हे दोघेही सावत्रभाऊ आहेत. त्यांचे वडील भाऊराव सीताराम डेकाटे हे गत २२ डिसेंबरला मरण पावलेत. तेव्हापासून शेतीच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद सुरू होता. हंसराज व त्याची दोन मुले प्रणय आणि प्रतीक हे नागपूरवरून येऊन विजय व त्याच्या आईशी वाद घालायचे. विजयकडे एक बैल आहे. या बैलावरून रविवारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हंसराज व त्याचा मुलगा प्रणय हे जबरण बैल विकायला नेत होते. विजयने त्यांना मनाई केली. यावरून संतापलेल्या बाप-लेकानी मिळून काठी व दगडाने विजयवर जोरदार हल्ला चढविला. यात जबर मार लागून विजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेच्यावेळी विजयची पत्नी करून डेकाटे (वय ३0) ही शेतात कामाला गेली होती. सूचना मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक निरीक्षक शरद भस्मे, उपनिरीक्षक प्रकाश चंगोले, शिपाई जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. नागपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांनी भागेबोरी येथे भेट देत पाहणी केली. करुणा डेकाटे हिच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३0२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. ठाणेदार महेश भोरटेकर पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply