आईनेच दिली मुलीच्या हत्येची सुपारी

चंद्रपूर : २४ फेब्रुवारी – कविठपेठ शिवारातील अर्जुन आत्राम यांचे शेतातील विहिरीत मिळालेल्या अनोळखी महिलेच्या प्रेताचे गुढ अखेर उलगडले असून, या प्रकरणी या महिलेचा नातेवाईक सिन्नू नरसिम्हा अजमेरा (वय ३५), त्याची पत्नी शारदा सिन्नू अजमेरा (वय २६, दोन्ही रा. मुंडीगेट, तालुका राजुरा) आणि या मृत महिलेची आई लचमी भीमा बदावत (वय ५0, रा. कोंडापल्ली, विजयवाडा, आंध्रप्रदेश) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२, २0१ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सैदा व तिची आई एका लग्न कार्यक्रमाला गेले होते. तेथे सिन्नू व त्याची पत्नी शारदा यांची भेट झाली. तिथे सिन्नू व शारदा सोबत सैदाला मारून टाकण्याचा कट रचला. त्यासाठी सिन्नुला ३० हजार रुपये देण्याचे वाचन दिले व त्यातील पाच हजार रुपये त्याला देण्यात आले.
सैदाला बाळ पाडून टाकण्याकरिता आमचे गावी औषधी देतात, असे खोटे सांगून तिला रेल्वेने मुंडीगेट येथे आणण्यात आले. सकाळी सिन्नुने मित्राची दुचाकी आणून व पोटातील बाळ पाडण्याचे औषधी घेण्याकरिता सैदा व पत्नी शारदा या दोघींना जंगलालगत असलेल्या कविठपेठ शिवारातील अर्जून आत्राम याचे शेतात घेऊन गेला. येथे औषधी देणार आहे, असे सांगून विहिरीजवळ घेवून गेले. तेथे सैदाला विहिरीतून पाणी काढण्यास सांगून ती वाकली असतांना शारदाने मागून जोराने धक्का देऊन ढकलले.
विहिरीत पडल्यावर परत मोठा दगड टाकला, मात्र सैदा पाण्यात बुडाल्याने मरण पावली. तेथून सिनूने त्याचे पत्नीला घरी सोडले व हैद्राबादला निघून गेला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात विरूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण, हवालदार माणिक वाग्दरकर, दिवाकर पवार, नरगेवार, विजय मुंडे, सविता गोनेलवार, सुरेंद्र काळे, भगवान मुंडे, अशोक मडावी, प्रमोद मिलमिले, अतुल सहारे, लक्ष्मीकांत खंडाळे, ममता गेडाम यांनी केली.

Leave a Reply