मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयासमोर जमा

मुंबई : २३ फेब्रुवारी – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे अडचणीत आले आहेत. आज बुधवार रोजी सकाळपासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मालमत्त्येच्या व्यवहारांबाबत भाजपने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयासमोर जमा झाले आहेत. तुम आगे बढो हम तुम्हारे साथे है अशा घोषणांनी ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात कार्यकर्ते मोठ्यामोठ्याने घोषणा देत आहेत – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. त्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे एकत्र झाले आहेत. दरम्यान, ईडी विरोधात, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात कार्यकर्ते मोठ्यामोठ्याने घोषणा देत आहेत. तसेच, मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने जमल्या आहेत.
नवाब मलिक जेव्हा एनसीबीच्या विरोधात बोलत होते त्यावेळीच नवाब मलिक यांनी एक ट्विट केले होते की, माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार आहेत. आज त्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. असही ते म्हणाले होते. भाजप नेत्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींचे काय झाले. नारायण राणे, विजयकुमार गावित, कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींचे काय झाले हा प्रश्नही आम्ही विचारणार आहोत असेही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply