औरंगाबाद : २२ फेब्रुवारी – रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबादमध्ये रिपब्लिक ऐक्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करतानाच आमचा भाजपाला पाठिंबा असल्याने आम्ही उमेदवार उभे केले नाहीत असं आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. याचवेळी त्यांनी दलित मतांसंदर्भात भाष्य करताना बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचाही उल्लेख केला.
“उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही उमेदवार उभे केले नाही. आमचा भाजपाला पाठिंबा आहे. दलित मतांवर मायावतींनाच फक्त अधिकार नाही. दलित ऐक्यासाठी पुढे आले पाहिजे. दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे, सत्तेत येणाची इच्छा प्रत्येकला असते मात्र तशी ताकद निर्माण झाली पाहिजे. विखूरलेला समाज एकवटण्याची गरज आहे,” असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना आठवले यांनी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीचा जनाधार कमी होत असल्याचीही उल्लेख केला. “प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा मात्र यापूर्वी त्यांनी जागा निवडणून आणल्या नाहीत,” असं आठवले म्हणाले.
“बाबासाहेबांनी सुरु केलेला रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याची गरज आहे. एकच लक्ष रिपलिकन पक्ष असा निरा दिला पाहिजे, प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय ऐक्य शक्य नाही,” असेही आठवले यांनी म्हटलं आहे.