वंचितच्या आघाडी करण्याच्या ऑफरवर नागपूर काँग्रेसची ‘वेट ॲंड वॅाच’ची भूमिका

नागपूर : २१ फेब्रुवारी – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी करण्याबाबत दिलेल्या ऑफरवर नागपूर काँग्रेसने ‘वेट ॲंड वॅाच’ची भूमिका घेतली आहे. नागपूर महापालिका निवडणुकीत 156 जागांसाठी काँग्रेसकडे 1500 च्या वर अर्ज येणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत वंचितसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची लेखी मतं जाणून घेणार आणि हायकमांडला अहवाल पाठवणार’ असं काँग्रेस नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार का, महाविकास आघाडीचं काय होणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे. मात्र एक महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस सोबत आघाडीचा आमचा प्रस्ताव अजूनही कायम असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.
‘नागपूर महापालिका निवडणुकीत 156 जागांसाठी काँग्रेसकडे 1500 च्या वर अर्ज येणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत वंचितसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची लेखी मतं जाणून घेणार आणि हायकमांडला अहवाल पाठवणार’ असं काँग्रेस नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply