भारताच्या तरुण ग्रॅण्डमास्टरने जगातील नंबर १ खेळाडूला हरवले

मुंबई : २१ फेब्रुवारी – भारताचा तरूण ग्रॅण्ड मास्टर आर. प्रागननंदानं सोमवारी धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याने ऑनलाईन रॅपिड चेस स्पर्धेत नंबर 1 खेळाडू मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. या स्पर्धेतील आठव्या फेरीत काळ्या सोंगट्यानं खेळणाऱ्या प्रागननंदानं कार्लसनचा 39 चालीमध्ये पराभूत केले. यासह त्याने कार्लसनच्या विजयी अभियानाला ब्रेक लावला.
भारतीय ग्रँडमास्टरचे या विजयासह 8 पॉईंट्स झाले आहेत. तो आठव्या फेरीनंतर संयुक्तपणे 12 व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही राऊंडमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळ न केलेल्या प्रागननंदानं कार्लसनला पराभूत करत खळबळ उडवून दिली आहे. त्याने यापूर्वी फक्त लेव आरोनियनविरूद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर त्याच्या 2 मॅच ड्रॉ झाल्या आणि 4 मॅचमध्ये त्याला पराभव सहन करावा लागला.
एअरथिंग्स मार्स्टर्स स्पर्धेत 16 खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये एक मॅच जिंकल्यानंतर 3 तर ड्रॉ केल्यानंतर 1 पॉईट दिला जातो. या स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यातील आणखी सात राऊंड बाकी आहेत. काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनचा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभव करणारा रशिया इयान नेपोमनियाचची 19 पॉईंट्ससह सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

Leave a Reply