बनावट कागदपत्रे बनवून दुचाकी कंपनीला लावला ३३ लाखांचा चुना

नागपूर : १८ फेब्रुवारी – शहरातील प्रतापनगर पोलिस ठाणे हद्दीत एका दुचाकी कंपनीला ३३ लाख २ हजार ३३४ रुपयांचा चुना लावल्याची घटना पुढे आली आहे. आरोपींनी लोकांचे पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक आदी बनावट कागदपत्रांच्या आधारावर कंपनीतून गाड्या फायनान्स केल्या. वसुलीकरिता एजंट त्यांच्या घरी आल्यानंतर मूळ पत्त्यावर त्यांचे घरच दिसून आले नाही. पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
१५ नोव्हेंबर २0२0 ते ३१ जुलै २0२१ या कालावधीत सकाळी ८ वाजताच्या सुमारास फिर्यादी निमश ब्रिजमोहन लथड (वय ४५, रा. प्लॉट क्रमांक २0३, फ्लॅट क्रमांक २४६, राधाकृष्ण रेसीडेंसी, बजाजनगर) हे हिंगणा रोडवरील लोक सुविधा फॉयनान्स कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, आरोपी शानू बाबुलाल राठोड (वय २३, रा. यशोधरानगर), स्नेहा राजेंद्र धार्मिक (वय ३१, रा. टिमकी) हे कंपीनमध्ये विक्री व फायनान्स अधिकारी आहेत. त्यांनी आरोपी इम्रान हसन (वय ३0, रा. उप्पलवाडी, माजरी), जावेद शेख (वय ३५, रा. महाल), प्रशांत पद्माकर (वय ३0, रा. उप्पलवाडी, माजरी) यांच्या मदतीने लोकांचे पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक, बनावट कागदपत्र लावत कंपनीकडून दुचाकी गाड्या फायनान्स केल्या होत्या.

Leave a Reply